पोलीस उपनिरीक्षक मुख्य परीक्षेची शारीरिक चाचणी लांबणीवर…

0
slider_4552

मुंबई :

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मुख्य परीक्षा – 2022 मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणीचा कार्यक्रम 15 एप्रिल ते 2 मे, 2024 या कालावधीत आयोजित केला होता. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तसेच कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याकरिता मनुष्यबळ आवश्यक आहे. या कारणांमुळे आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध होवू न शकल्याने शारीरिक चाचणीचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून सांगण्यात आले आहे.

पोलीस उपनिरीक्षक मुख्य परीक्षा – 2022 च्या शारीरिक चाचणीच्या कार्यक्रमाकरिता पोलीस अधिकारी तसेच इतर मनुष्यबळ पुरविणे शक्य होणार नसल्याचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक यांनी कळविले असल्याने शारीरिक चाचणी पुढे ढकलण्यात आली आहे.

*सुधारित कार्यक्रम स्वतंत्रपणे जाहीर करणार*

राज्यात होणाऱ्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तसेच कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याकरिता मनुष्यबळ आवश्यक असल्याने शारीरिक चाचणीच्या कार्यक्रमाकरिता पोलीस अधिकारी तसेच इतर मनुष्यबळ पुरविणे शक्य होणार नसल्याचे शारीरिक चाचणीचा दिनांक 15 एप्रिल ते 2 मे, 2024 या कालावधीतील नियोजित कार्यक्रम पुढे ढकलण्यात येत असून, शारीरिक चाचणीचा सुधारित सविस्तर कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहे.

*पोलीस उपनिरीक्षक’ संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर*

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब मुख्य परीक्षा- 2021 या परीक्षेतील पोलीस उप निरीक्षक संवर्गाच्या एकूण 378 पदांसाठी सर्वसाधारण गुणवत्ता यादी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जाहीर केली आहे. ही यादी आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे.

ही सर्वसाधारण गुणवत्ता यादी ही निव्वळ तात्पुरत्या स्वरुपाची असून उमेदवारांच्या अर्जामधील विविध दाव्यांच्या अनुषंगाने अंतिम निकालापूर्वी पडताळणीअंती काही उमेदवारांच्या दाव्यांमध्ये, शिफारशीमध्ये बदल होऊ शकतो, असे आयोगाकडून सांगण्यात आले आहे.

See also  रेशनिंग दुकानांमध्ये विविध सुविधा उपलब्ध करून देण्यास राज्य सरकारची परवानगी : छगन भुजबळ