नवी दिल्ली:
केंद्रीय गृहमंत्रालयाकडून पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यासह ७ जणांना पद्मविभूषण पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. सोबतच दहा जणांना पद्मविभूषण आणि १०२ जणांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. अभिमानाची बाब म्हणजे यामध्ये महारष्ट्रातील ६ लोकांची वर्णी लागलेली आहे.
यामध्ये अनाथांची माई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. प्रेमाला पोरक्या झालेल्या असंख्य निराधारांना आपल्या मायेच्या स्पर्शाने प्रेमाने आपलसं करणा-या सिंधुताई सपकाळ या मातेची कहाणी सर्वांना थक्क करणारी आहे.
माई मुळच्या विदर्भातल्या, वर्धा जिल्ह्यातील नवरगाव ही त्यांची जन्मभूमी. त्यांचे वडील अभिमान साठे गुरे वळण्याचं काम करायचे. सिंधुताई सपकाळ यांचा संपूर्ण जीवन प्रवास अतिशय संघर्षमय असा आहे. माईनी अनेक अनाथ मुलांना वाढवले, शिक्षण दिले, जगण्याची प्रेरणा दिली आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे समाजात मानाचे स्थान मिळवून दिले आहे. यामुळे माईंना मिळालेला हा पुरस्कार निश्चितच संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे.
महाराष्ट्रातील पद्म पुरस्काराने सन्मानित व्यक्ती
रजनीकांत देविदास श्रॉफ – पद्मभूषण (व्यापार)
परशुराम आत्माराम गंगावणे – पद्मश्री (कला)
नामेदव सी. कांबळे – पद्मश्री (शिक्षण आणि साहित्य)
जसवंतीबेन जमनादास पोपट – पद्मश्री (व्यापार आणि व्यवसाय)
गिरिश प्रभुणे – पद्मश्री (सामाजिक काम)
सिंधुताई सपकाळ – पद्मश्री (सामाजिक काम)