प्रचंड उकाड्यामुळे पुणेकर हैराण.. वडगाव शेरी, कोरेगाव पार्क आणि चिंचवड येथे तापमान 41 अंश सेल्सिअसच्या

0
slider_4552

पुणे :

या आठवड्यात राज्यातील काही ठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली असली तरी राज्यात अवकाळीचे ढग गायब झाले असून कमाल तापमानात (Pune) वाढ होत असताना दिसून येत आहे.

आज दि. (19 एप्रिल) रोजी पुणे शहरात 39.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाले असून पिंपरी-चिंचवड उपनगरात 41.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याची कळते. पुणे जिल्ह्यात शिरूर येथे सर्वाधिक 43.3 अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले असून, लोणावळा येथे 35.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालेली आहे.

वाढत्या उकाड्यामुळे शहर परिसरातील नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. जिल्हयातील सर्व भागात तापमानात वाढ झाल्यामुळे रस्त्यांवरील लोकांची गर्दी कमी झाल्याची दिसून येते. आज शिरूर येथे 43.3, तळेगाव ढमढेरे -42.9, कोरेगाव पार्क- 42.3, राजगुरुनगर- 42.7, मगरपट्ट्यात- 41.1, खेड 41.2 आणि चिंचवड येथे 41.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील काही दिवस तापमानात वाढ कायम राहून उकाडा कायम राहील असे वर्तवण्यात आले आहे.

*शहर परिसरातील तापमान पुढीलप्रमाणे-*

See also  पुण्यातील टिंबर मार्केटमध्ये भीषण आग ३० अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न...