पुणे :
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी ईव्हीएम मशीनची पूजा केल्याने नवीन वाद त्यांनी ओढवून घेतला. निवडणूक अधिकाऱ्यानेच त्यांच्याविरोधात तक्रार केली असून रुपाली चाकणकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खडकवासला परिसरातील घटना
“राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या आज दि.(7 मे) रोजी खडकवासला परिसरातील एका मतदान केंद्रावर पोहोचल्या. मतदान सुरु होण्यापूर्वी त्या औक्षण करण्याचे ताट घेऊन मतदान केंद्रात दाखल झाल्या. त्यानंतर त्यांनी मतदान केंद्रातील ईव्हीएम मशीनची पूजा केली”. त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यानेच त्यांच्याविरोधात तक्रार केली असून रुपाली चाकणकर यांच्यावर सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.