मतदान केंद्रांच्या 100 मीटर परिसरातील आस्थापना सुरु ठेवण्यास मनाई

0
slider_4552

पुणे :

पुणे व शिरुर मतदारसंघात 13 मे रोजी होणाऱ्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान सुरळीत, शांततेत पार पाडण्यासाठी, सार्वजनिक शांततेला व मालमत्तेला धोका पोहोचू नये यासाठी मतदान केंद्रांच्या 100 मीटर परिसरातील अत्यावश्यक सेवा वगळून सर्व व्यावसायिक दुकाने, रेस्टॉरंट, टपऱ्या आदी सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश शहराचे पोलीस सहआयुक्त प्रविण पवार यांनी जारी केले आहेत.

पुणे पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात पुणे लोकसभांतर्गत वडगाव शेरी, शिवाजीनगर, कोथरुड, पर्वती, पुणे कॅन्टोन्मेंट व कसबा पेठ तसेच शिरुर मतदार संघातील शिरुर व हडपसर विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. हे आदेश पुणे लोकसभा मतदारसंघांतील 405 मतदान केंद्रामधील 2017 मतदान खोल्यांसाठी तसेच शिरुर मतदारसंघातील 129 मतदान केंद्रांमधील 708 मतदान खोल्यांसाठी लागू राहतील.

मतदान केंद्रांच्या 100 मीटर सभोवतालच्या परिसराचा प्रचारासाठी व इतर कारणांसाठी गैरवापर होण्याची शक्यता लक्षात घेऊन फौजदारी दंड प्रक्रिया संहिता 1973 च्या कलम 144 अन्वये जारी करण्यात आले आहेत. हे आदेश 12 मे रोजी रात्री 12 वाजेपासून मतदान प्रक्रिया संपेपर्यंत लागू राहतील, असेही आदेशात म्हटले आहे.

See also  कात्रज बोगदा ते नवले पूलादरम्यान जड वाहनांसाठी 40 किमी प्रतितास वेगमर्यादा निश्चित