पुणे :
कला, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांना ‘ग्लोबल आयकॉन्स ऑफ इंडिया’ 2024 पुरस्कार जाहीर. पुढे बोलताना योगेश पवार म्हणाले,आम्ही सातत्याने महिलांच्या आरोग्या विषयीचे विविध उपक्रम राबवित असतो. या शो मधून जमा होणारा निधी महिलांच्या आरोग्यविषयक जनजागृती मोहिमेसाठी वापरला जाणार आहे.







यंदाच्या पुरस्कारांसाठी आमच्या मान्यवर निवड समितीच्या वतीने सेलेब्रिटींची निवड करण्यात आली आहे, यामध्ये सुप्रसिद्ध हास्य अभिनेता समीर चौघुले, अभिनेता हार्दिक जोशी, चिन्मय उदगीरकर, हर्षद अत्तकरी, अभिनेत्री सुरूची अडारकर – रानडे, चला हवा येऊ द्या फेम योगेश शिरसाट, लेखक दिग्दर्शक मिलिंद शिंत्रे आणि आरजे संग्राम यांना ‘ग्लोबल आयकॉन्स ऑफ इंडिया’ 2024 पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे, तर भारतीय लष्करात देशसेवेचे कर्तव्य बजावत असताना अपंगत्व आलेले जवान सदाशिव घाडगे यांचा विशेष पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे.








