मुंबई :
विधानपरिषदेच्या रिक्त झालेल्या 11 जागांसाठी आज दि. (12) रोजी मुंबई येथे निवडणूक पार पडली असून महायुतीचे सर्वच्या सर्व उमेदवार विजयी झाले असल्याचे समजते. महाविकास आघाडीचे उमेदवार शेकापचे जयंत पाटील यांचा या निवडणुकीत पराभव झाला.







याबाबतची सविस्तर माहिती अशी आहे की, विधानपरिषदेच्या रिक्त झालेल्या 11 जागांसाठी एकूण 12 उमेदवार रणांगणात उतरले होते. महायुतीने एकूण नऊ उमेदवारांना विधानपरिषदेसाठी उतरविले
होते. महायुतीने दिलेले सर्व उमेदवार विजयी झालेले असून यात प्रामुख्याने पंकजा मुंडे, अमित गोरखे,सदाभाऊ खोत, भावना गवळी यांची नावे आहेत.
विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार विधानपरिषदेच्या रणांगणात होते, त्यापैकी, 10 जागांचा निकाल लागला असून भाजप,शिवसेना(एकनाथ शिंदे गट) आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसचे( अजित पवार गट) सर्व उमेदवार निवडून आलेले आहेत त्यामुळे महायु्तीचे पदाधिकारी, कार्यकर्ते प्रचंड खुश झाले असल्याचे समजते. तसेच महाविकास आघाडीमधील प्रज्ञा सातव विजयी झाल्याचे समजत असून 11 व्या जागेसाठी मिलिंद नार्वेकर आणि जयंत पाटील(शेकाप) यांच्यात चुरस होती. काँग्रेसच्या डॉ. प्रज्ञा राजीव सातव २५ मतं मिळवत विजयी झाल्या. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार मिलिंद नार्वेकर २३ मतं मिळवत विजयी झाले आहेत तर शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार जयंत पाटील यांचा पराभव झाला असून त्यांना केवळ १२ मतं पडली आहेत.
*महायुतीचे निवडून आलेले उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे*
पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, अमित गोरखे, परिणय फुके, सदाभाऊ खोत, राजेश विटेकर, शिवाजीराव गर्जे, भावना गवळी आणि कृपाल तुमाने.








