दिल्ली :
वादग्रस्त प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी पूजा खेडकर यांच्यावर दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यासंदर्भात त्यांनी दिल्लीच्या पटीयाला कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. पण हा अर्ज आज न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे आता दिल्ली पोलिसांकडून पूजा खेडकर यांच्या अटकेची कारवाई होण्याची शक्यता आहे.







बोगस प्रमाणपत्राबाबत यूपीएससीने कारवाई करत पूजा खेडकर यांचे आयएएस पद काढून घेतलं असून तिला भविष्यात कोणत्याही परीक्षेला बसण्यास मनाई केली आहे. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानेही तिचा अटकपूर्व जामीन नाकारला आहे. यूपीएससीमध्ये खोटं दिव्यांग प्रमाणपत्र सादर केल्याचा आरोप करत पूजा खेडकरवर दिल्लीमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यामध्ये आपल्याला अटक होऊ नये यासाठी पूजा खेडकरने अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. तो न्यायालयाने नाकारला आहे
पटीयाला न्यायालयाने म्हटले आहे की ,यूपीएसीमधील आणखी कुणी पूजा खेडकर यांना या सगळ्या प्रकारात मदत केली आहे का? याचीही चौकशी दिल्ली पोलिसांनी करावी”, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. त्याचबरोबर, “पूजा खेडकर यांच्याव्यतिरिक्त इतर असे कोणते उमेदवार आहेत का ज्यांनी निकषांत बसत नसतानाही क्रिमीलेअर सुविधेचा लाभ घेऊन ओबीसी कोट्यातून अर्ज केला होता किंवा दिव्यंगत्वासाठीचे पात्रता निकष ओलांडले होते याचा तपास यूपीएससीनं करावा”, असे आदेश यावेळी न्यायालयाने दिले.








