ज्येष्ठ गांधीवादी, समाजसेविका शोभनाताई रानडे यांचे निधन

0
slider_4552

पुणे :

जेष्ठ गांधीवादी नेत्या व गांधी नॅशनल मेमोरियल, आगाखान पॅलेसच्या विश्वस्त सचिव पद्मभूषण शोभना ताई रानडे यांचं रविवार दिनांक 4 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजता राहत्याघरी वृध्दापकाळाने दुःखद निधन झालं.त्या 99 वर्षाच्या होत्या.त्यांच्या पश्चात दोन मुली , नातवंडे ,पतवंडे असा परिवार आहे.गांधी विचारानं भारावलेल्या व विनोबाजीच्या प्रिय शिष्या असल्याने त्यांनी आयुष्यभर खादी ग्रामोद्योग, नशाबंदी,महिला सबलीकरण, भूदान,ग्रामदान,पर्यावरण, बालविकास,शिक्षण असं विविधांगी कार्य केल.

निराधार महिला आणि अनाथ बालकं हा त्यांच्या सेवेचा केंद्रबिंदू होता. रविवारी सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.या प्रसंगी बजाज उद्योग समुहाचे श्री.संजीव बजाज,माजी आमदार श्री.मोहन जोशी, श्री.उल्हासदादा पवार,श्री.अभय छाजेड, जनसेवा फाउंडेशन चे अध्यक्ष डॉ.विनोद शहा, गांधी नॅशनल मेमोरियल चे विश्वस्त श्री. प्रदीप मुनोत,महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे विश्वस्त श्री.अभय छाजेड , श्री.अन्वर राजन.समाज कार्यकर्त्या मनिषा कामगार नेते श्री.नितीन पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

सामाजिक कार्यासाठी केंद्र सरकारने रानडे यांना 2011 मध्ये पद्मभूषण किताबाने सन्मानित केले होते. येत्या 26 ऑक्टोबर रोजी त्या वयाची शंभरी पुर्ण करणार होत्या.

शोभनाताईंचा जन्म 26 ऑक्टोबर 1924 रोजी रत्नागिरीत झाला. वयाच्या 16 व्या वर्षी 1940 साली त्यांचा विवाह पुण्यातील सिताराम रानडे यांच्याशी झाला.

महात्मा गांधभेटीने त्या भारावल्या व विनोबांच्या शिष्या झाल्या.आयुष्यभर त्या गांधीवादी विचारांनी कार्यरत राहिल्या.

1955 ते1972 या काळात त्यांनी आसाममध्ये विविध प्रकारचे रचनात्मक कार्य केलं. महाराष्ट्रात परतल्यावर त्यांनीआचार्य विनोबा भावे यांच्या जन्मस्थानी गागोदे बुद्रुक येथे 15 ऑगस्ट 1974 ला अनाथ आणि निराधार मुलांसाठी पहिले बाल सदन सुरू केले. पुण्यातील आगाखान पॅलेसमध्ये त्यांनी गांधी नॅशनल मेमोरिअल सोसायटीची विश्वस्त सचिव म्हणून जबाबदारी स्वीकारली. या ठिकाणी संपुर्ण भारतातील महिलांना गांधी विचारांवर आधारित समाजकार्य, खादी ग्रामोद्योग, नेतृत्व विकास,असे विविध प्रकारचे प्रशिक्षण सुरू केलं.आगाखान पॅलेसला महात्मा गांधी आणि कस्तरबांच जीवंत स्मारक बनविण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.

See also  अण्णा हजारे यांचे उपोषण स्थगित..

शोभनाताई रानडे या कस्तुरबा गांधी नॅशनल मेमोरियल ट्रस्ट, गांधी स्मारक निधी, बालग्राम महाराष्ट्रच्या विश्वस्त, गांधी नॅशनल मेमोरियल सोसायटीच्या सचिव, अखिल भारतीय महिला निरक्षरता निर्मूलन समिती, अखिल भारतीय महिला परिषद आणि भूदान ग्राम दान मंडळ महाराष्ट्र या संस्थेच्या अध्यक्ष राहिल्या. त्यांनी निराधार महिला आणि मुलांसाठी केलेल्या सेवा कार्याबद्दल त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

जमनालाल बजाज पुरस्कार, रवींद्रनाथ टागोर पुरस्कार, राजीव गांधी मानव सेवा पुरस्कार, प्राईड ऑफ पुणे पुरस्कार यासहबाल कल्याण कार्यासाठी नेहरू पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले.