पुणे :
जागतिक आदिवासी दिनानिमित्त प्रशासना तर्फे काही आदिवासी बहुल भागातील आदिवासी लोकांना एक लहानशी भेट देण्यात आली आहे. ही भेट अशी आहे, की 9 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी आंबेगाव, जुन्नर व मावळ तालुक्यातील पेसा क्षेत्रातील आदिवासी बहुल गावामध्ये स्थानिक सुट्टी जाहीर केल्याचे आदेश जारी केले आहेत.
जगभरातील आदिवासी समाजाच्या हक्कांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांचा संदेश प्रसारित करण्यासाठी आदिवासी दिन साजरा केला जातो.