प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेला वीजग्राहकांचा प्रतिसाद; 4714 सौर प्रकल्प कार्यान्वित

0
slider_4552

मुंबई :

केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेमध्ये पश्चिम महाराष्ट्रात आतापर्यंत 31 हजार 904 घरगुती वीजग्राहक सहभागी झाले. त्यातील 4 हजार 714 वीजग्राहकांकडे 19.3 मेगावॅट क्षमतेचे छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. तर आणखी 875 सौर प्रकल्पांचे कामे पूर्ण झाले असून उर्वरित मंजूर 26 हजार 315 सौर प्रकल्पांची कामे प्रगतिपथावर आहेत

घराच्या छतावरील 1 ते 3 किलोवॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाद्वारे दरमहा सुमारे 120 ते 360 युनिटपर्यंत वीज मोफत मिळविण्यासाठी प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना सुरु आहे. या योजनेची अंमलबजावणी युद्धपातळीवर करण्याची सूचना उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. विशेष म्हणजे या सौर प्रकल्पांसाठी सौर नेटमीटर महावितरणकडून देण्यात येत असून 10 किलोवॅटपर्यंतच्या अर्जांना स्वयंचलित मंजुरी देण्यात येत आहे. सोबतच या योजनेसाठी विविध बँकांकडून सवलतीच्या व्याजदराने कर्जाची सोय उपलब्ध आहे

ग्राहकांनी तसेच सातारा- 8.5 मेगावॅटसाठी 3280, सोलापूर- 14.6 मेगावॅटसाठी 4806, कोल्हापूर- 17 मेगावॅटसाठी 5492 आणि सांगली जिल्ह्यात 10.5 मेगावॅटसाठी 3765 असे पश्चिम महाराष्ट्रात आतापर्यंत 31 हजार 904 घरगुती वीजग्राहकांनी 106 मेगावॅट क्षमतेच्या छतावरील सौर प्रकल्पांसाठी ऑनलाइन अर्ज केले आहेत. हे सर्व अर्ज मंजूर झाले आहेत.

छतावरील सौर ऊर्जा प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून घरगुती वीजग्राहकांना एक किलोवॅटसाठी तीस हजार रुपये, दोन किलोवॅटसाठी साठ हजार रुपये आणि तीन किलोवॅट व त्यापेक्षा जास्त क्षमतेसाठी कमाल 78 हजार रुपये अनुदान थेट मिळत आहे. तसेच गृहनिर्माण संस्था, घरसंकुलांसाठी विद्युत वाहन चार्जिंग स्टेशन व कॉमन उपयोगासाठी 500 किलोवॅटपर्यंत प्रति किलोवॅट 18 हजार रुपये असे कमाल 90 लाख रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येत आहे. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी ग्राहकांनी https://pmsuryaghar.gov.in या संकेतस्थळावर योजनेची सर्व माहिती उपलब्ध आहे.

See also  तंत्र व शिक्षण विभागाच्या परीक्षा 15 फेब्रुवारीपर्यंत ऑनलाइनच