23 ते 28 सप्टेंबर या कलावधीत राज्यात जोरदार पावसाची शक्यता

0
slider_4552

पुणे :

अंदमान बेटाच्या उत्तर भागात हवेची चक्रीय स्थिती निर्माण होऊन कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचा अंदाज आहे. या कमी दाबाच्या क्षेत्राची महाराष्ट्राच्या दिशेने वाटचाल होण्याची शक्यता आहे. परिणामी राज्यात 23 ते 28 सप्टेंबर या काळात दमदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.विदर्भ, मराठवाडा, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये पावसाचा जोर जास्त राहणार आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अंदमान बेटाच्या उत्तर भागात शनिवारी (21सप्टेंबर ) हवेची चक्रीय स्थिती निर्माण होऊन कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचा अंदाज आहे. हे कमी दाबाचे क्षेत्र महाराष्ट्राच्या दिशेने वाटचाल करण्याची शक्यता आहे. त्यामुळे विदर्भ, मराठवाड्यासह राज्यात सर्वदूर 23 ते 28 सप्टेंबर, या काळात म्हणजेच पुढील आठवडाभर जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

हवामान विभागाने दक्षिण राजस्थानमधून मोसमी पावसाचा परतीचा प्रवास सोमवारी, 23 सप्टेंबर पासून सुरू होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. सोमवारी परतीचा प्रवास सुरू झाला तरीही अंदमान मधील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मध्य भारतासह महाराष्ट्रातून मोसमी पाऊस माघारी जाण्यास अडथळा निर्माण होणार आहे.

See also  विद्यार्थ्यांना शुल्कात सवलत न दिल्यास आंदोलन : पालकांचा इशारा