बाणेरच्या भैरवनाथ शिक्षण संस्थेच्या आदित्य इंग्लिश मीडियम स्कूल च्या विद्यार्थ्यांनी मिळवले खेळामध्ये घवघवीत यश

0
slider_4552

बाणेर :

शालेय राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत आदित्य इंग्लिश मीडियम स्कूल (बाणेर ) दबदबा. जिल्हा क्रीडा संघटनेतर्फे आयोजित शालेय राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत पुण्याच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत अंडर-17 मुलांचे सुवर्णपदक पुण्याने छत्रपती संभाजी नगर वर 2-0 करत विजेते पदावर पटकावले. अंतिम सामन्यात पुण्याने छत्रपती संभाजीनगरवर 2-0 अशी मात करत विजेतेपदावर अटीतटीच्या सामन्यात शिक्कामोर्तब केले.

यापूर्वीच्या सामन्यात पुण्याने कोल्हापूरला 2-0 तर उपांत्य फेरीत नाशिकला 2-0 अशा सरळ सामन्यात पराभूत केले. संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट खेळ करून आदित्य इंग्लिश मीडियम स्कूलच्या पुणे संघाने एकतर्फी विजयांची मालिका कायम ठेवली.
🏆 विजेत्या अंडर-17 पुणे संघातील खेळाडू:
1. आयुष आदे
2. ओजस जोशी
3. कपिल जगदाळे
4. माधव कामत
5. राघवेंद्र यादव
या पाचही खेळाडूंच्या दमदार खेळीमुळे पुण्याने राज्यात विजेतेपद मिळवण्यास यश मिळवले. तसेच या स्पर्धेतून आयुष आदे व ओजस जोशी यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली असून, आदित्य इंग्लिश मीडियम स्कूल( बाणेर) पुणे जिल्ह्याचा अभिमान अधिक उंचावला आहे.
या विद्यार्थ्यांचे संस्थेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

🏸 अंडर-19 समूहातही पुण्याचा लौकिक अंडर-19 मुलांच्या गटात निक्षेप केदार कतरे याचीही राष्ट्रीय संघामध्ये निवड झाली. त्याच्या या यशामुळे आदित्य इंग्लिश मीडियम स्कूल (बाणेर ) पुणे जिल्ह्यात आनंद व गौरवाचे वातावरण निर्माण झाले आहे.विजेत्या सर्व खेळाडूंचे खेळाचे प्रशिक्षक सचिन डावकरे यांनी मार्गदर्शन केले .

See also  लहु बालवडकर यांचे आरोग्य शिबिर समाजाला नवी दिशा देणारे : मुरलीधर मोहोळ