पुणे शहर भाजप नगरसेवकांचा अभ्यासवर्गाला शंभर टक्के उपस्थिती.

0
slider_4552

पुणे :

भाजपच्या नगरसेवक फुटीच्या चर्चांना लगाम घालीत पुणे शहर भाजपच्या वतीने आयोजित केलेल्या भाजपच्या महापालिकेतील नगरसेवकांनी अभ्यास वर्गाला शंभर टक्के उपस्थिती लावली , तसेच शहरातील सर्व आमदारांनी देखील उपस्थिती लावली . ठाण्यातील केशव सृष्टी येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत हा दोन दिवसांचा अभ्यास वर्ग आयोजित करण्यात आला होता . महापालिका निवडणुका वर्षावर येऊन ठेपल्याने नगरसेवकांच्या बंडाळी बाबतच्या बातम्यांना उधाण आणण्यामागे काही मंडळी आता पासूनच सक्रीय झाली असली तरी जे काही उलथापालथ होईल ती ऐन निवडणुकीच्या तोंडावर होईल असे स्पष्ट झाले आहे

एवढेच काय सध्या पदाधिकारी तरी बदलावेत याबाबत देखील या अभ्यास वर्गाच्या निमित्ताने कोणीही ब्र काढल्याचे वृत्त नाही अगर नाराजी व्यक्त केल्याचे दिसून आले नाही हे विशेष म्हणावे लागणार आहे. दिल्लीतील अधिवेशनामुळे खासदार गिरीश बापट अनुपस्थित राहिल्याचे सांगण्यात येते . त्यांचे छायाचित्र व्यासपीठावरील बॅॅक ड्रॉप वर होते मात्र महत्वाचे म्हणजे ज्या संजय काकडे यांचे सहाय्य गेल्या महापालिका निवडणुकीत आणि लोकसभा व विधानसभा निवडणुकीत घेतले गेले होते . ना त्यांचे छायाचित्र बॅॅक ड्रॉप वर होते ,ना ते उपस्थित होते.मात्र त्यांचे सर्व समर्थक नगरसेवक उपस्थित होते. दरम्यान आज पुण्यात या सर्व पार्श्वभूमीवर संजय काकडे यांना अशा वातावरणात राष्ट्रवादी ,शिवसेना, किंवा कॉंग्रेसच्या वतीने सुरक्षेची शाश्वती देणारे आमंत्रण येऊ शकेल काय ? यावर राजकीय सामिक्ष्कांमध्ये नानाविध प्रकारची मते व्यक्त होताना दिसत होते. तर काकडे आता राजकारणात राहणार नाहीत असाही दावा काहीजण करत आहेत . काकडे यांच्या राजकीय व्यूहरचने मुळे २ जण आमदार होता होता ..पराभूतझाले . आणि तिथे भाजपचा विजय झाला. या आठवणींना माध्यमे येनकेन मार्गे उजाळा देण्याचा प्रयत्न करीत आहेत

दरम्यान काल या अ भ्यास वर्गाच्या उद्घाटन सत्रात प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील भाजप, संघटना आणि आजपर्यंतचा इतिहास या विषयावर मार्गदर्शन केले. प्रदेश अभ्यास वर्गाचे प्रमुख योगेश गोगावले यांनी अभ्यास वर्गांची उपयुक्तता या विषयावर भाषण केले.

See also  किल्ले अजिंक्यताऱ्यावर सापडली ऐतिहासिक तिजोरी, खजिना असण्याची शक्यता.

प्रदेश संघटनमंत्री विजयराव पुराणीक यांनी भाजप आणि संघ परिवार या विषयावर मार्गदर्शन केले. त्यानंतर माजी मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्प या विषयावर मार्गदर्शन केले. प्रदेश सरचिटणीस श्रीकांत भारतीय यांनी सोशल मीडिया, मीडिया आणि पत्रकार संवाद या विषयाची सविस्तर माहिती दिली.

दुसर्‍या दिवशी मानसोपचार तज्ज्ञ डॉ. पाटकर यांनी ताणतणावमुक्त जीवनशैली या विषयावर माहिती दिली. त्यानंतर हरीष देवळणकर यांनी परराष्ट्र राजनीती आणि मोदींचे धोरण या विषयावर आंतररराष्ट्रीय राजकीय परिस्थिती विषद केली. माजी मंत्री आशीष शेलार यांनी महापालिकेला निवडणुक डोळ्यासमोर ठेवून निवडणुकीचे मायक’ो प्लॅनिंग कसे करायचे याचे मार्गदर्शन केले.

समारोपाच्या सत्रात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मार्गदर्शन केले. महाविकास आघाडीतील तीनही घटक पक्ष एकत्र आल्याने निर्माण होणारी स्पेस भरुन काढण्याची संधी भारतीय जनता पार्टीला आहे. त्यामुळे आगामी काळात भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रात बहुमतासह मोठा पक्ष असेल असा विश्‍वास फडणवीस यांनी व्यक्त केला. गेल्या काही वर्षां कर्नाटक आणि राजस्थानात आज महाराष्ट्रात जशी स्थिती आहे तशीच स्थिती होती. प्रादेशिक पक्ष कॉंगेसबरोबर गेले, त्यांची ताकद कमी झाली आणि निर्माण झालेली स्पेस भाजपने भरून काढली आज त्या राज्यांत भाजप सर्वात मोठा पक्ष आहे.

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, पुणे महापालिकेत भाजपने खूप चांगली विकासकामे केली आहेत. पुण्यातील भाजपची विकासकामे आणि मुंबई शिवसेनेनी केलेली विकासकामे या तुलनेतून आम्ही मुंबई महापालिकाही जिंकू असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

शहराध्यक्ष जगदीश मुळीक, महापौर मुरलीधर मोहोळ, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, सभागृहनेते गणेश बिडकर,आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, मुक्ता टिळक,सुनील कांबळे, उपमहापौर सरस्वती शेंडगे, ,प्रभारी धीरज घाटे, संघटन सरचिटणीस राजेश पांडे, गणेश घोष, दत्ता खाडे, दीपक नागपुरे, राजेश येनपुरे, दीपक पोटे, संदीप लोणकर, योगेश टिळेकर, बापू पठारे,यांची उपस्थिती होती.