श्री क्षेत्र बाणेश्वर देवस्थानात पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त ‘शिवमयं श्रावण उत्सव’ चे आयोजन

0
slider_4552

बाणेर :

श्री बाणेश्वर सेवा ट्रस्टच्या वतीने पांडवकालीन गुफा मंदिर असलेल्या प्रसिद्ध श्री क्षेत्र बाणेश्वर देवस्थान येथे पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त ‘शिवमयं श्रावण उत्सव’ मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला आहे. श्रावण हा भक्ती, श्रद्धा, साधना आणि सेवाभावाचा महापर्व मानला जात असल्याने या निमित्ताने मंदिरात विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.

दिवसभरातील धार्मिक कार्यक्रम व दर्शन वेळा:

* रुद्र अभिषेक: पहाटे ५:०० ते ६:०० या वेळेत सर्व विश्वस्त व सेवेकरी सभासदांच्या वतीने रुद्र अभिषेक केला जाईल.

* गर्भगृह स्पर्श दर्शन: सकाळी ६:०० ते रात्री ११:०० वाजेपर्यंत (आरतीच्या वेळा वगळून) संपूर्ण दिवस भाविकांना श्री बाणेश्वराचे गर्भगृह स्पर्श दर्शन खुले राहील.

(टीप: गर्भगृहात फक्त पारंपरिक वेषभूषेमध्येच प्रवेश दिला जाईल. पाश्चिमात्य पोशाखात आलेल्या व्यक्तींनी गर्भगृहाबाहेरूनच दर्शन घ्यावे, अशी सूचना ट्रस्टतर्फे करण्यात आली आहे.)

आरतीच्या वेळा:

* प्रातः आरती: सकाळी ६:०० ते ६:२०

* महामंगल संध्याआरती: रात्री ७:०० ते ८:०० (या वेळेत ‘ॐ नमः शिवाय’ १०८ जप, स्वाध्याय, गुरू आवाहन, सप्तर्षी शंखनाद आणि महाकाल धून गजर होईल.)

* शयन आरती: रात्री १०:३० वाजता

इतर कार्यक्रम व उपक्रम:

* प्रसाद सेवा: दिवसभर भाविकांसाठी प्रसाद सेवेचे आयोजन.

* रक्तदान शिबिर: सकाळी १०:०० ते दुपारी ३:०० वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबिर.

* भजन: सायंकाळी ४:०० ते ६:०० या वेळेत ‘ज्योतिबा महिला भजनी मंडळ, सुतारवाडी’ यांचे भजन.

* शिव संकीर्तन: रात्री ८:०० ते ९:३० या वेळेत श्री बाणेश्वर शिव संकीर्तन.

मंदिर परिसरातील नियोजित विकास कामे:

बाणेश्वर मंदिराच्या विकासासाठी आणि भाविकांच्या सोयीसाठी काही नवीन उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. यामध्ये गोशाळा, अन्नप्रसादालय व भक्तनिवास, गुफा मंदिराच्या मागे ३० फूट उंच महादेवाची मूर्ती, गर्भगृहाच्या वर श्रीयंत्र स्थापना आणि ॲम्फिथिएटर डान्सिंग फाऊंटन यांसारख्या भव्य विकास कामांचा समावेश आहे.

पूजा, अभिषेक व देणगी स्वीकारण्याची व्यवस्था मंदिरात उपलब्ध असून अधिक माहितीसाठी ८७८८४४२७८८ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.

See also  "स्वारद फाऊंडेशन" तर्फे गरजू लोकांना अन्न मिळावे या हेतूने 'एक घास आपुलकीचा' हा उपक्रम : स्वाती मोहोळ