कडक लॉकडाऊन करण्यास भाग पाडू नये, हा शेवटचा इशारा आहे : मुख्यमंत्री

0
slider_4552

मुंबई:

गेल्यावर्षी ऑक्टोबरपासून आपण सर्व व्यवहार सुरु केले आणि त्यानंतर सुमारे ४ महिने आपण सर्वांनी एकजुटीने संसर्ग रोखला, पण आता मोठ्या प्रमाणावर होणारी गर्दी आणि नियम न पाळल्याने संसर्ग वेगाने वाढत आहे. अजूनही परिस्थिती नियंत्रणात असून हॉटेल व उपाहारगृहांनी नियमांचे पालन करावे, कडक लॉकडाऊन करण्यास भाग पाडू नये, हा शेवटचा इशारा आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नमूद केले.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, गेल्या ४ महिन्यांत सर्व काही व्यवस्थित चाललं होतं. आपल्याच राज्यात नव्हे तर अगदी युरोपमध्ये सुद्धा जणू काही करोना गेला असे समजून सर्व व्यवहार मोकळेपणाने सुरु झाले होते. मात्र, अचानक सर्वत्र संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असून तिकडे ब्राझीलमध्ये भयानक स्थिती झाली आहे. आपल्याला युरोपसारखी परिस्थिती होऊ द्यायची नसेल तर काटेकोरपणे आरोग्याचे नियम पाळावे लागतील.

आपल्याला कोविड बरोबरच जगायचे असून जीवनपद्धती त्याला अनुरूप करावी लागेल. बंदी आणि स्वयंशिस्त यात फरक असून सर्वांनी याचे भान ठेवावे असेही ते म्हणाले. मागील वर्षी विशेषत्वाने झोपडपट्टीत मोठ्या प्रमाणावर संसर्ग दिसू लागला होता. यावेळी मात्र तो इमारती, बंगले, सोसायट्यांमध्ये दिसतो आहे. याचे कारण म्हणजे समाजातील या वर्गाचे गेल्या काही दिवसांपासून एकमेकांना भेटणे, हॉटेलिंग, मॉल्समध्ये जाणे सुरु झाले आहे. त्यामुळे परिवारातल्या सर्व सदस्यांत एकदम फैलाव होत आहे, असे नमूद करत मुख्यमंत्र्यांनी सध्याच्या स्थितीवर बोट ठेवले.

See also  फी कपातीच्या निर्णयाविरोधात खासगी शाळांच्या संघटनांनी न्यायालयात जाण्याचा दिला राज्य सरकारला इशारा