पुणे :
ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत. अनेक नागरिक व्यवसाय साठी ऑनलाईन जाहिराती कडे जातात. पण या जाहिरातीचा फायदा ऑनलाईन लुटारू घेत असल्याचे लक्षात येत आहे. किंवा फसवणुकीच्या जाहिरात स्वतःही देऊन नागरिकांची फसवणूक होत असल्याचे अनेक प्रकार समोर येत आहे.
यामध्ये प्रामुख्याने हे लुटारू आर्मी अधिकारी असल्याचे भासवले जाते. आर्मी अधिकारी म्हणजे नागरिकांना विश्वासार्हता वाढते त्याचा फायदा हे घेत आहेत. ऑनलाईन जाहिराती टाकून व पाहून हे व्यवसाय साठी कॉल करतात. कॉल केल्यानंतर आम्ही आर्मी अधिकारी आहोत आम्हाला तुमचा मला खरेदी करायचा आहे, रूम भाड्याने घ्यायचे आहे, किंवा गाडी विकणे आहे अशा प्रकारच्या जाहिरातीच्या माध्यमातून नागरिकांना संपर्क करतात.
नागरिकांना संपर्क केल्यानंतर आम्हाला तुमच्या अकाउंट वर ठरलेले पैसे पाठवायचे आहेत. यासाठी एक क्यू आर कोड पाठवतात. सुरुवातीला फक्त एक रुपयाचा क्यू आर कोड पाठवतात. तो क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर आपल्या खात्यामध्ये एक रुपया त्याच्या अकाउंटला जातो त्यानंतर ते दोन रुपये आपल्याला पाठवतात. अशा पद्धतीने तुम्ही पाठवलेले पैसे व त्यानंतर तुम्हाला ठरलेल्या व्यवहाराचे पैसे दिले जातील असे भासवतात.
समजा तुमचा व्यवहार पाच हजार रुपये चा ठरला असेल तर, आधी तुम्ही माझ्या अकाउंट ला 5000 पाठवा. नंतर लगेच मी तुम्हाला दहा हजार पाठवता येतील असे पटवून सांगतात. परंतु आपण एकदा रक्कम पाठवली की पैसे काही परत येत नाही. ती दुसऱ्याच्या अकाउंट ला गेली, तुम्हाला काही वेळाने भेटेल, एक-दोन दिवसात परत येईल अशी उत्तरं दिली जातात. एक रुपयाला परत आलेले दोन रुपये मुळे आपण फसतो व मोठे व्यवहार करतो त्यामुळे ऑनलाइन दरोडेखोरांना पासून सावध राहा. या मध्ये विशेषतः महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना फसविले जात आहे.
आपल्या आसपास घडलेले काही किस्से :
१) एका नोकरदार माणसाला त्याचा फ्लॅट भाड्याने द्यायचा होता. त्याला कॉल येतो मी मिल्ट्री ऑफिसर आहे. पुण्यात माझी बदली होणार आहे. मला तुमचा फ्लॅट आवडला आहे. मला तो भाड्याने घ्यायचा आहे. तुम्हाला काही रक्कम पाठवतो यासाठी क्यू आर कोड पाठवला जातो. त्यानंतर पाठवलेल्या क्यू आर कोड वर सदर नोकरदार माणसाच्या अकाउंट वरील पैसे दाहा हजार रुपये काढून घेतले गेले. ते पैसे दुसऱ्याच्या अकाउंट वर गेलेत तुम्ही परत पाठवा. हे पैसे व तुमचे आता पाठवलेले पैसे असे तुम्हाला परत मिळवून देतो. सांगून आणखीन पैसे लुटण्याचा प्रकार घडला आहे.
२) ऑनलाइन दुचाकी विक्रीची जाहिरात पाहून ती खरेदी करण्यासाठी निर्णय घेतला. ही दुचाकी इतरांपेक्षा स्वस्तात विकली जात असल्याने ती घेण्याचा मोह अनावर झाला व संबंधित जाहिरातदाराला कॉल केला असता त्यांने विमाननगर ला राहिला असून, मी एअरफोर्समध्ये मध्ये कामाला आहे. माझी बदली झालेली आहे. त्यामुळे मला ही वाहन कमी किमतीत विकून जायचे आहे असे सांगितले. खरेदी करणाऱ्यांनी तयारी दाखवली व त्याला लगेच मी गाडी कोणालाही दाखवत नाही. त्यासाठी तुम्ही काही ॲडव्हान्स द्या असे सांगून पाचशे रुपये ऑनलाइन घेतले. विमान नगर एयरफोर्स परिसरात बोलवले. त्याठिकाणी जाऊन सदर व्यक्तीला फोन केले असता, त्या व्यक्तीने आता मी तिथे येऊ शकत नाही. तुम्हाला पास बनवून घ्यावा लागेल या पास साठी तुम्हाला दोन हजार रुपये मला पाठवावे लागतील असे सांगितले. त्यावेळेस वाहन खरेदी करणाऱ्याला संशय आला व त्यांनी पैसे पाठवणे टाळले. वाहन विक्री करणाऱ्यांनी त्याच्या वाहनांची आर सी, आधार कार्ड, पॅन कार्ड फोटो ही पाठवले होते. त्यामुळे खात्री झाल्याचे वाहन खरेदी करणार्यांनी सांगितले परंतु थोडक्यात ते बचावले.
३) एका व्यवसायिकांनी आपला माल विकण्यासाठी ऑनलाइन जाहिरात केली होती. त्यांना फोन येतो मी आर्मी ऑफिसर बोलत आहे. आमच्या कॅन्टींग साठी तुमचा माला हवा आहे. आमचे सर तुम्हाला फोन करतील. पेमेंट डिटेल्स देतील. त्यांचा व्यवहार बारा हजार ठरतो. आमच्याकडे पैसे पाठवण्याची पद्धत क्यू आर कोडणे आहे असे सांगितले जाते. प्रथम एक रुपयाचा ठरल्याप्रमाणे क्यू आर कोड पाठवला जातो. त्या बदल्यात दोन रुपये अकाउंटला येतात.
नंतर 12000 पाठवण्यास सांगितले जातात. परंतु वेळेच हा कॉल फ्रॉड असल्याचा कळाल्यावर, त्यांनी भेटून तुम्हाला माल देतो व पैसे घेतो असे सांगितले. यावर मी ऑफिसर आहे तुम्हाला कळत नाही का? तुमच्यासाठी साठी मी 12000 रुपयाचा क्यू आर कोड वापर केला आहे. तुम्हाला हे पैसे भरावे लागतील. तुम्हाला खूप महागात पडेल अशी उत्तर समोरून आली. त्यावर वाद घातल्यानंतर समोरून शिव्याही देण्यात आल्या.
अशा प्रकारच्या फसवनूका आपल्या आसपासच्या परिसरात होत असून ऑनलाइन ट्रांजेक्शन करताना काळजी बाळगा. आतापर्यंत अनेका नागरिक अश्या फसवणुकीचे बळी पडलेले लक्षात येत आहे. याबाबत अनेकांनी सायबर क्राईम मध्ये तक्रारही दाखल केल्या आहेत.