पत्रकारांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा मिळावा : मराठी पत्रकार परिषद

0
slider_4552

मॅक न्यूज :

राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येनी झपाट्याने वाढ होत असल्याचे चित्र असतानाच पत्रकारितेतील तीन वरिष्ठांचे निधन झाल्यामुळे राज्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

अहमदनगरचे लोकसत्ता प्रतिनिधी अशोक तुपे, उस्मानाबादचे ज्येष्ठ पत्रकार मोतीचंद बेदमुथा आणि सोपान बोंगाणे यांचे कोरोनाने निधन झाले तर दिल्लीतही काही पत्रकारांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

न्यूज लाँड्रीचे पत्रकार आशिष येचुरी, द प्रिंट हिंदीच्या संपादक रेणू अगाल यांचे कोरोनाने निधन झाल्यावर पत्रकारिता वर्तुळात शोककळा पसरली आहे. महाराष्ट्रात कोरोनामुळं बळी घेतलेल्या पत्रकारांची संख्या आता 105 झाली आहे, अशी माहिती मराठी पत्रकार परिषदेनी दिली आहे.

कोरोनाच्या काळात अनेक पत्रकारांनी प्रत्यक्ष फिल्डवर जात वृत्तांकन केले आहे, त्यांना अत्यावश्यक सेवेत गणलं जातं पण फ्रंटलाईन वर्कर म्हटलं जात नाही. त्यामुळेच धोका पत्करून फिल्डवर जाणाऱ्या अनेक पत्रकारांना अद्यापही कोरोनाची लस मिळाली नसल्याची खंत पत्रकारितेतील दिग्गजांनी व्यक्त केली आहे.

पत्रकारांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा मिळावा, अशी मागणी ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी पुन्हा एकदा केली आहे. अनेक तरुण पत्रकार त्यांचा जीव धोक्यात घालून काम करत आहेत. त्यांना फ्रंटलाईन वर्कर असा दर्जा मिळाला पाहिजे, असं वागळे म्हणाले.

See also  ग्राहक न्यायालयांचे बळकटीकरण केले पाहिजे : राज्यपाल