पुण्यातील घोटावडे फाटा येथील कंपनीला भीषण आग

0
slider_4552

पुणे :

पुण्यातील घोटावडे फाटा येथील कंपनीला भीषण आग लागली आहे. या आगीत ७ जणांचा मृत्यू झाला असून १० कर्मचारी बेपत्ता आहे. आग लागली त्यावेळी कंपनी ३७ कर्मचारी होते त्यापैकी २० जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आले आहे. संबंधित कंपनीचं नाव एसव्हीएस अक्वा टेक्नॉलॉजिस असं आहे.

अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्यासाठी शर्थीची प्रयत्न सुरू आहे. आग लागलेली कंपनी ही मुळशीतील उरवडे गावाच्या हद्दीत आहे. आग लागलेली कंपनीत सॅनिटायजर बनवण्याचे काम करण्यात येत होते. सॅनिटायजर असल्याने आगीने लगेच रौद्ररूप धारण केले असावे असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

चिंताजनक बाब म्हणजे या कंपनीत काही कामगार अडकल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे.या कंपनीत अन्य केमिकल्स देखील तयार केले जातात. याच केमिकल्समुळे ही आग लागल्याचा अंदाज वर्तवला गेला आहे. या आगीमुळे परिसरात मोठ्याप्रमाणावर धूर देखील पसरला आहे.

याबात अधिक माहिती अशी की, पुणे जिल्ह्यातील मुळशीमधील उरवडे येथील औद्योगिक परिसरातील एसव्हीएस अक्वा टेक्नॉलॉजिस या केमिकल कंपनीला आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. त्यावेळी कंपनीत ४१ कामगार होते, या आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू असून १७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतांमध्ये महिलांचे प्रमाण जास्त आहे. तर इतर कामगारांचा शोध घेतला जात आहे. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.

See also  ऑक्सिजन नियंत्रणासाठी पुणे जिल्हा प्रशासनाकडून 2 ॲपची निर्मिती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण