पुणे :
गणेशखिंड येथील पी.ई.सोसायटीच्या मॉडर्न कॉलेज येथे फ्युचर बँकर्स फोरम यांनी १८ जून ते ४ जुलै या कालावधीत “ऑपरेशनल बँकिंगमध्ये स्किल डेव्हलपमेंट” कोर्स आयोजित केला होता. या कार्यक्रमाचा उद्देश बँकिंग ऑपरेशनच्या क्षेत्रात व्यावहारिक कौशल्यांची माहिती देणे हा होता. विद्या सहकारी बँक व माजी विद्यार्थ्यांशी सल्लामसलत करून हा कोर्स बनविला गेला.
कार्यक्रमाचे उद्घाटन प्राध्यापक ए.जी.गोसावी, मॉडर्न कॉलेज शिवाजीनगरचे माजी प्राचार्य व माजी बँकर यांच्या हस्ते केले. त्यांनी बँकिंग भरतीच्या बदलत्या परिस्थितीवर मार्गदर्शन केले. डी.जी. कॉलेज सातारा येथील बँकिंग विभागाचे प्रमुख डॉ. विजय कुंभार यांनी विद्यार्थ्यांशी बँकेतल्या नोकरीच्या विविध संधीं यावर संवाद साधला व बँक परीक्षांची तयारी कशी करावी याचे मार्गदर्शन केले.
दिपाली अथल्या यांनी सिंहगड रोड च्या शाखेत बँकेच्या विविध भूमिका व जबाबदाऱ्या, भांडवल बाजारातील बँकांची भूमिका आणि बँकेच्या म्युच्युअल फंडाच्या व्यवसायावर चर्चा केली.
पुर्ववर्ती बँकर अभिजित देसाई यांनी बँकेच्या पुनर्प्राप्ती व्यवस्थापनावर संवाद साधला. विद्या सहकारी बँकेचे ए.जी.एम श्री मिलिंद पाटणकर , बँकेच्या मुख्य कार्यालयाचे कामकाज यावर चर्चा केली.
रत्नाकर देवळे आरबीआयचे माजी मुख्य महाव्यवस्थापक यांनी भारतीय रिझर्व्ह बँकच्या नियामक भूमिकेविषयी संवाद साधला.
४ जुलै २०२१ रोजी कौशल्य विकास अभ्यासक्रम आणि सत्कार कार्यक्रमाचा हा उपक्रम सोहळा आयोजित करण्यात आला होता. प्राचार्य डॉ. संजय खरात यांनी वाणिज्य विद्याशाखेने कोविड साथीच्या परिस्थितीतही ऑनलाईन उपक्रम घेतले याचे कौतुक केले.
प्रमुख पाहुणे प्रदीप देव, डिप्टी जनरल मॅनेजर, एसबीआयचे जोखीम व्यवस्थापक विभाग, कॉर्पोरेट कार्यालय मुंबई यांनी बँकेतील जोखीम व्यवस्थापनावर भाषण दिले. दरवर्षी फ्युचर बँकर्स फोरमतर्फे स्वर्गीय सी.डी.देशमुख यांच्या स्मरणार्थ हा उपक्रम घेण्यात येतो. सन २०-२१ मध्ये मंगेश कांबळे यांना एफबीएफ प्राइड देण्यात आले. आणि बीसीओएम च्या तीन वर्षांच्या योगदानाबद्दल फाबिन जोसेफ यांचे विशेष कौतुक केले.
डॉ.संजय खरात व प्राचार्य प्रा.डॉ.शुभांगी जोशी यांनी एफबीएफला सल्ला व प्रेरणा दिली होती.
विद्यार्थीः सत्राचे प्रभारी सिमरन बंसीवाल, सीमा चांदोरा, नंदिनी पोळ, रुडोल्फ डी सिल्वा, मिथिलेश गुराव, सौरभ कुलकर्णी, योगिता मोहिते आणि लिबरथ हे होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा विजयलक्ष्मी कुलकर्णी आणि डॉ.पल्लवी निखारे यांनी केले
या कार्यक्रमाला ९८ विद्यार्थी (आँनलाईन) उपस्थित होते.