मुम्बई :
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग राज्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प असून देशातील सर्वात मोठा महामार्ग असणार आहे. १० जिल्हे २६ तालुके व ३९२ गावांना जोडणाऱ्या या महामार्गाचे काम पर्यावरणाला धोका निर्माण होणार नाही याची दक्षता घेत वेगाने काम करण्यात येत आहे. या महामार्गावर ११ लाख झाडे लावण्यात येणार असल्याची माहिती शिवेसेना नेते एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. महामार्गावर मध्यभागी असलेल्या दुभाजकावर वेगवेगळ्या प्रकारची शोभेची रोपे झाडे लावण्यात येणार आहे. या रोपांमुळे महामार्गावरील प्रवास हा प्रदूषणमुक्त होणार आहे. तसेच महामार्ग काही वर्षांतच हिरवाईने नटलेला यला मिळेल.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी ७०१ किमी लांबीचा व १२० मी. रूंदीचा हा महामार्ग सहापदरी असणार असून गती मर्यादा १५० किमी असल्याने हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर मुंबई नागपूर अंतर फक्त ८ तासांत कापता येणार आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजूस एकूण ११ लाख ३१ हजार झाडे लावण्यात आली आहेत. महामार्गाच्या परिसरात (कॉरिडोरमध्ये) अपघात टाळण्यासाठी तसेच वन्यप्राण्यांचा थेट प्रवेश रोखण्यासाठी, वन्यजीवनाला आकर्षित करणार्या १३ फळ झाडांच्या प्रजातींची लागवड करण्यात येणार नाही. या महामार्गाच्या बांधणीच्या कामात वन्य जीव संरक्षण या संस्थेची मदत घेतली जात आहे.