खेड पंचायत समिती शिवसेनेकडे बहुमत असताना सुद्धा सभापतीपद गमावण्याची नामुष्की.

0
slider_4552

खेड :

पुणे जिल्ह्यातील खेड पंचायत समिती सभापतीपदावरुन शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा संघर्ष तीन महिन्यांपासून सुरू होता. मात्र अखेर आज सभापतीपदाची निवडणूक पार पडली. शिवसेनेकडे बहुमत असताना सुद्धा सभापतीपद गमावण्याची नामुष्की ओढावली आहे. सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अरुण चौधरी यांची निवड झाली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या गोटात खळबळ उडाली आहे.

खेड पंचायत समितीवर शिवसेनेची एकहाती सत्ता असताना शिवसेनेतील सदस्यामध्ये मतभेद झाल्याने सभापतीपदावरुन शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा संघर्ष सुरू झाला याचदरम्यान हाणामारी झाली आणि शिवसेनेचे काही सदस्य राष्ट्रवादीशी सलग्न झाले आणि पक्षनेतृत्वाकडे तक्रारी झाल्या. मात्र, याच दरम्यान प्रामाणिक शिवसैनिकांवर अन्याय झाल्याची संतप्त भावना शिवसेनेच्या माजी उपसभापती ज्योती अरगडे यांनी व्यक्त करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना म्हटलं आहे की, “साहेब शिवसैनिकांच्या अन्यायाला वाचा फोडा अन्यथा शिवसेना हे नावच संपून जाईल व शिवसेनेवरचा लोकांचा विश्वास उडेल” सभापतीपदासाठी खेड पंचायत समितीच्या राजा शिवछत्रपती सभागृहात झालेल्या विशेष बैठकीत सभापती पदासाठी दोन अर्ज दाखल झाले होते. शिवसेनेच्या वतीने भगवान पोखरकर यांनी अर्ज दाखल केला होता. त्यांना पंचायत समिती सदस्य ज्योती अरगडे यांनी अनुमोदक म्हणून त्यांच्या उमेदवारी अर्जावर सही केली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गटनेते अरुण चौधरी यांनी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या उमेदवारी अर्जावर पंचायत समिती सदस्य वैशाली गव्हाणे यांनी सही केली आहे. या दरम्यान नामनिर्देशिन पत्राच्या छाणनीत शिवसेनेचे उमेदवार भगवान पोखरकर यांच्या ओबीसी जात प्रमाणपत्राची पडताळणी नसल्याचे कारण देत अर्ज बाद करण्यात आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराची बिनविरोध निवड झाल्याचे प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण यांनी जाहीर केले. शिवसेनेकडे बहुमत असून सुद्धा सभापतीपद हातातून गेल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

See also  सत्ताबदलानंतर सुरक्षा कपातीची परंपराच.