पुण्यात एकाच दिवसात २७९ नवे करोना रुग्ण तर पिंपरीत १३२ नवे रुग्ण

0
slider_4552

पुणे शहरात दिवसभरात २७९ करोना बाधित रुग्ण आढळले. तर आज अखेर १ लाख ७२ हजार ५५९ इतकी संख्या झाली आहे. तर याच दरम्यान आठ रुग्णांचा मृत्यू झाला असून ४ हजार ५१० मृतांची संख्या झाली. त्याच दरम्यान २२० जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आजअखेर १ लाख ६२ हजार ९७९ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात १३२ करोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून १५१ जण करोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात सहा जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण बाधित रुग्णांची संख्या ९३ हजार ६४७ वर पोहचली असून पैकी ८९ हजार ८९८ जण करोनातून ठणठणीत बरे झाले आहेत. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सक्रिय रुग्णांची संख्या ९९७ एवढी आहे अशी माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

See also  मावळ तालुक्यातील श्री क्षेत्र भंडारा डोंगर वाचला, रिंगरोडच्या रेखांकनात बदल करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आदेश.