मुंबई :
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा NCBला लक्ष्य केले आहे. उद्धव ठाकरेंनी एनसीबीचा खरपूस समाचार घेत महाराष्ट्र पोलिसांनी हिरॉईन (अभिनेत्री) नव्हे तर हेरॉईन (ड्रग्ज) पकडले त्यामुळे मुंबई पोलिसांना प्रसिद्धी मिळाली नाही.
असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे. महाराष्ट्र पोलिसांनी काही दिवसांपूर्वीच मोठी कारवाई करत 25 कोटी रुपयांची आम्ली पदार्थ पकडले आहेत.
काल आर्यन खान प्रकरणात NCB ने अभिनेत्री अनन्या पांडे हिची देखील चोकशी केली आहे. त्याच पार्शवभूमीवर मुख्यमंत्र्यांचं हे विधान आले आहे. तसेच ‘आजकाल एकच गोष्ट घडत आहे ड्रग्स, ड्रग्स आणि ड्रग्स. दसरा मेळाव्यातही मी म्हणालो होतो की एकट्या महाराष्ट्रात संपूर्ण जगात पेक्षाजास्त ड्रग्जचे सेवन होत, असे चित्र उभं केलं जात आहे पण असं नाही’ असे सांगत मुख्यमंत्रांनी NCB ला खडेबोल सुनावले आहेत.
त्याचबरोबर त्यांनी ‘आमच्या मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांनी चार दिवसांपूर्वी २५ कोटींचे ड्रग्ज पकडले. त्यांनी ‘हिरॉईन’ नव्हे तर ‘हेरॉइन’ पकडली. म्हणूनच त्यांना प्रसिद्धी मिळाली नाही. पण त्यांचा आम्हाला अभिमान वाटला.’ असे सांगत त्यांनी पोलिसांची पाठ थोपटली आहे. त्याचबरोबर त्यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना आपण त्यांचा सन्मान केला पाहिजे असे सांगत महाराष्ट्र पोलीस दल सशक्त, कार्यक्षम आहे आणि आम्ही गुन्हेगारांबाबत कोणताही उदारपणा दाखवत नाही आणि आम्ही त्यांच्याशी कडकपणे वागतो आणि आमची ही प्रतिष्ठाच काही लोकांकडून जाणीवपूर्वक बदनाम केली जात असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.