औंध :
औंध मध्ये काँग्रेस नेते माजी नगरसेवक दत्तात्रय बहिरट यांनी पत्रकार परिषद घेऊन आमदार व नगरसेवकांमध्ये समन्वयाच्या अभावामुळे नागरिकांची कामे रखडत असल्याचा आरोप केला आहे. कामे थांबवणे मागे होत असलेला भ्रष्टाचाराचा आरोप त्यांनी केला.
भाजपा मधला अंतर्गत वाद भाजप पदाधिकारी व नगरसेविका यांच्या राजीनाम्यामुळे आला असला, तरी समन्वय अभावामुळे नागरिकांची कामे रखडतात याला जबाबदार कोण ? औंध आयटीआय रोड वर बांधण्यात आलेल्या स्वच्छतागृह पाडण्यात यावी अशी मागणी पक्षातील वरिष्ठ करतात, तर या स्वच्छतागृह बांधणीसाठी नगरसेवक काम करतात. बांधण्यात आलेली वस्तू पाडण्याची मागणी का केली जाते. यामागे नेमके काय कारण आहे. याची तपासणी करण्याची मागणीही यावेळी बहिरट यांनी केली.
तसेच यावेळी बोलताना भाजपच्या दररोज येत असलेल्या बातम्यांमधून भ्रष्टाचार चाललेला आहे दिसून येतो. सध्या सभागृहांमध्ये घाईघाईने निर्णय घेण्याची कामे चालू आहेत. कामे न करता बिल ही काढले जात आहेत. स्मार्ट सिटी च्या नावाखाली कामे केली जात आहेत. परंतु भ्रष्टाचार युक्त स्मार्ट सिटी असे चिन्ह दिसत आहेत. भागातील आमदारांनी समस्या सोडवण्याचे प्रयत्नशील राहावे की स्वच्छतागृह पाडण्यासाठी, याचा विचार केला गेला पाहिजे.
ओढ्या वरील अतिक्रमणांमुळे अनेक वेळा पावसाळ्यात नागरिकांच्या घरात पाणी शिरूर नुकसान होत असले तरीही याकडे प्रशासकीय अधिकारी दुर्लक्ष करतात. नेमक्या कोणाच्या सांगण्यावरून नगरसेवकांनी तक्रार केली तरी याकडे दुर्लक्ष होत आहे. अशा सर्व लोकहिताच्या कामासाठी काँग्रेस सदैव नागरिकांच्या बाजूने उभे राहील. वेळ पडल्यास औंध भागांमध्ये आंदोलनही केले जाईल अशी माहिती पत्रकार परिषदेमध्ये दत्तात्रय बहिरट यांनी दिली. यावेळी माजी नगरसेवक शिवाजी बांगर, राजेंद्र भुतडा, मनोज दळवी, सुनील जाधवर आदी उपस्थित होते.