ओमिक्रॉनच्या विरूद्ध कोव्हॅक्सिन अधिक प्रभावी ठरण्याची शक्यता

0
slider_4552

मुंबई :

कोरोनाच्या ऑमिक्रॉन या नव्या व्हेरियंटने देशात धुमाकूळ घातला आहे. कर्नाटकची राजधानी बंगळुरूत ओमिक्रॉनचे (Omicron) रुग्ण सापडले आहेत. यानंतर सध्या देशातील लसी ओमिक्रॉनलाही प्रतिरोधक आहे का?, असा सवाल केला जात आहे.

अशाच याबाबत भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या अधिकाऱ्याने महत्त्वाची माहिती दिली आहे.

भारत बायोटेकची कोविड लस कोव्हॅक्सिन ओमिक्रॉन व्हेरिएंटविरुद्ध अधिक प्रभावी ठरू शकते, असं भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या अधिकाऱ्याने सांगितलं आहे.

बाकी कोरोना लसींच्या तुलनेत ओमिक्रॉनच्या विरूद्ध कोव्हॅक्सिन अधिक प्रभावी ठरण्याची शक्यता आहे. कोवॅक्सिन, एक virion-निष्क्रिय लस संपूर्ण व्हायरस कव्हर करते आणि या अत्यंत उत्परिवर्तित नवीन व्हेरिएंटविरूद्ध कार्य करू शकते, असं अधिकाऱ्यानं स्पष्ट केलं आहे.

कोव्हॅक्सिन हे अल्फा, बीटा, गामा आणि डेल्टा सारख्या इतर प्रकारांविरूद्ध देखील प्रभावी असल्याचं आढळून आले आहे. त्यामुळे आम्ही आशा करू शकतो की ते नवीन व्हेरिएंटविरूद्ध देखील प्रभावी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

वुहानमध्ये सापडलेल्या मूळ प्रकाराविरूद्ध ही लस विकसित केली गेली आहे आणि ती इतर व्हेरिएंटविरूद्ध कार्य करू शकते हे दाखवून दिलं आहे, असं ते म्हणालेत.

दक्षिण आफ्रिकेत ओमिक्रॉन हा कोरोनाचा नवा व्हॅरिएंट आढळून आल्यानं जगभरातले देश सतर्क झाले आहेत. या व्हेरिएंटचा प्रसार रोखण्यासाठी तातडीनं पावलं उचलली जात आहेत. भारतानेदेखील या व्हेरिएंटचा प्रसार रोखण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत.

सरकार गंभीर आजार असलेल्या आणि कमकुवत इम्युनिट असलेल्या गटाला लशीचा बुस्टर डोस देण्याबाबत नवं धोरण आणणार आहे. नॅशनल टेक्निकल अॅडव्हायझरी ग्रुप दोन आठवड्यांत हे धोरण तयार करणार आहे.

एनटीएजी देशातल्या 44 कोटी बालकांच्या लसीकरणासाठी नवं धोरणदेखील आणणार आहे, अशी माहिती देशाच्या कोविड टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. एन. के. अरोरा यांनी दिली आहे.

See also  प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांचे जुने वादग्रस्त धोरण रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय