नाशिक :
राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या आकस्मित निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. याबाबत नाशिक दौऱ्यावर असताना आमदार रोहित पवार यांना विचारला असता त्यांनी सांगितले की, पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार व तेथील पालकमंत्री याबाबत निर्णय घेतील.
कार्यकर्त्यांमध्ये चर्चा होत असली तरी निर्णय मोठे नेते घेतात. त्यामुळे येथील लोकांना योग्य तो न्याय दिला जाईल असा विश्वास आहे. रोहित पवार यांनी सांगितले परिस्थिती आणि कार्यकर्त्यांची मागणी लक्षात घेऊन निर्णय होतो. कोणी कशीही मागणी केली तरी ती लगेच मान्य होते असे नाही.
चंद्रकांत पाटलांच्या मुद्द्यावर बोलताना रोहित पवार म्हणाले की चंद्रकांत पाटील कोल्हापूरला जातील पण त्यांचे स्वागत कोल्हापूर कर करतील का? हे पाहू, तसेच एकनाथ खडसे इडी ला समोर जातील. पण राजकीय पद्धतीने जर कोणी अशा संस्थेचा वापर करत असतील तर हे अयोग्य आहे असे ते म्हणाले.