पुणे :
पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या 23 ग्रापंचायतींमध्ये सर्व शासकीय नियम डावलत बोगस नोकर भरती झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी 14 ग्रामसेवक 2 कृषीविस्तार अधिकारी असे एकूण 16 जणांना निलंबित करण्यात आले आसून; 22 अधिकार्यांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.







तर संबंधित ग्रामपंचायती मधील 212 माजी ग्रामपंचायत सदस्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.
पुणे महानगरपालिकेमध्ये आसपासची गावे पालिकेमध्ये समाविष्ट करण्याची प्रक्रिया चालू आहे. याचाच फायदा घेवून येथील येथील अधिकाऱ्यांनी बोगस भरती केली असल्याची चर्चा होती. पुणे महापालिकेत समाविष्ट होण्यापूर्वी 20 ग्रामपंचायतींमध्ये चुकीच्या पद्धतीने कर्मचारी भरती करण्यात आल्याच्या तक्रारींची चौकशी करण्यात आली. तत्कालीन महिला व बालविकास अधिकारी दत्तात्रय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. या समितीने आपला अहवाल मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सादर केला आहे.
ग्रामपंचायतींवर प्रशासक असताना अधिकार्यांनी नियम बाह्य पध्दतीने नोकर भरती केल्याचा आरोप सिद्ध झाला आहे. त्यानुसार 14 ग्रामसेवक आणि दोन कृषी विस्तार अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. या 23 ग्रामपंचायती पुणे महापालिकेत जाण्यापूर्वी 658 जणांची भरती करण्यात आल्याची माहिती चौकशीतून समोर आली आहे.








