बालेवाडी :
बालेवाडी येथे डॉ. सागर बालवडकर यांच्या संकल्पनेतून एसकेपी रोलिंग ट्रॉफी बालेवाडी प्रीमियर लीग चे आयोजन केले होते. २०१५ पासुन सलग डॉ. सागर बालवडकर यांच्या संकल्पनेतून प्रभागातील सोसायटीतील नागरिकांसाठी एसकेपी रोलिंग ट्रॉफी बालेवाडी प्रीमियर क्रिकेट लीग चे आयोजन केले जाते. सोसायटी मधील नागरीकांना एकत्रीत आणून मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करण्याच्या हेतूने हि लीग सुरू केली गेली. या क्रिकेट लीग मुळे सोसायटी वर्ग फार मोठया प्रमाणात एकमेकांशी बांधला गेला. या स्पर्धेच्या निमित्ताने सोसायट्यांमधील स्पर्धकाने एकत्र येत अतिउच्च प्रदर्शन केले. समाजात सुध्दा अशीच एकतेची वाढ झाली पाहिजे हे या निमित्ताने दाखवून दिले.







ह्या प्रीमियर लीग चा अंतिम सामना नुकताच संपन्न झाला. या स्पर्धेमध्ये पीएक्स वॉरियर्स संघाने दणदणीत विजय मिळवत एसकेपी रोलिंग ट्रॉफी वर आपले नाव कोरले. या स्पर्धेचा बक्षीस समारंभ राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते समीर चांदेरे आणि सरलाताई चांदेरे यांच्या शुभ हस्ते पार पडला.
एक्विलाइफ हिटर्स विरूद्ध पीएक्स वॉरियर्स यांच्यामध्ये अंतिम सामना खेळविण्यात आला. एक्विलाइफ हिटर्स ने प्रथम फलंदाजी करताना दहा षटकात 102 धावा आठ बळी गमावून केल्या तर या धावसंख्येचा पाठलाग करताना पीएक्स वॉरियर्स संघाने उत्कृष्ट फलंदाजी करत केवळ एक गडी गमावून ९ विकेटने विजय संपादन केला. संकेत शास्त्रीच्या धडाकेबाज फलंदाजी ला महेश कांदपल ची मिळालेली साथ यामुळे त्यांनी सहज विजय मिळविला.
तत्पूर्वी तृतीय आणि चतुर्थ क्रमांका साठीच्या झालेल्या सामन्यात BAHUBALI BPL संघाने GT HAWKS संघावर 5 विकेट ने मात केली. पुण्यात टॉस जिंकून BAHUBALI BPL संघाने प्रथम क्षेत्ररक्षण पत्करले. GT HAWKS संघाने निर्धारित 10 सटका मध्ये आठ विकेट गमावून 101 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना BAHUBALI BPL संघाने राहुल घिवारी च्या धुवाधार फलंदाजीच्या जोरावर 5 विकेट राखून विजय मिळवत तृतीय क्रमांक पटकावला. तर पराभूत झालेल्या GT HAWKS संघाला चतुर्थ क्रमांकावर समाधान मानावे लागले.
या स्पर्धेतील मालिकावीर – रवी मानवतकर
उत्कृष्ट फलंदाज – अपूर्व चौबे
उत्कृष्ट गोलंदाज – चिन्मय मालवणकर
उत्कृष्ट क्षेत्ररक्षक -गुरुशांत बिरारी
यावेळी नगरसेवक बाबुराव चांदेरे, श्री. खंडेराय प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गणपतराव बालवडकर, डॉ. सागर बालवडकर, प्रा रूपाली बालवडकर, समीर चांदेरे, सरलाताई चांदेरे, ज्योती सुर्यवंशी, नितिन कळमकर, पुनम विधाते, राष्ट्रीय खेळाडू महेश बालवडकर, बालाजी जाधव, स्वप्निल बालवडकर अशोक बालवडकर, पोपटराव बालवडकर, गणेश बालवडकर, प्रभागातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सोसायटी मधील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.








