पुण्यातील साठीतील ६ सायकलवीरांनी पुणे ते सुंदरबन २१०० किलोमीटरचा प्रवास अवघ्या १६ दिवसात केला पूर्ण

0
slider_4552

पुणे :

वय झाले म्हणून जगण्याला मर्यादा घालणारे आहेतच परंतु यामध्ये उतारवयातही आयुष्य भरभरून जगणारे निश्चितच वेगळे ठरतात.

असेच वेगळेपण जपणाऱ्या पुण्यातील साठीतील ६ सायकलवीरांनी पुणे ते सुंदरबन (पश्चिम बंगाल) हा तब्बल २१०० किलोमीटरचा प्रवास अवघ्या १६ दिवसात पूर्ण केला.

निवारा वृध्दाश्रमातील व्ही 3 फिटनेसच्या वतीने या ज्येष्ठ सायकलवीरांचा सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांनी आपले अनुभव उपस्थितांना सांगितले. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते जुगल राठी, व्ही ३ फिटनेसचे विकास मालपुटे आदी उपस्थित होते. यावेळी निरुपमा भावे (वय ७४), अपर्णा महाजन (६९), एकादशी कोल्हटकर (५७), ज्योती भक्ता (५४), चंद्रशेखर व्यंकटरमन (६०), जयंत देवधर (६७) यांचा सन्मान करण्यात आला.

एकादशी कोल्हटकर म्हणाल्या, अनेकांना महिला सायकलवर प्रवास करतात याचं आश्चर्य वाटतं. आम्ही जेव्हा गावात जातो तेव्हा त्या लोकांना आमचे खूप कुतूहल वाटते. त्यांना आमच्या सायकलला हात लावायचा असतो, आमच्या बरोबर फोटो काढायचा असतो. अनेकजण आमचा सत्कार करतात तर काही लोक मदत करण्यासाठी ही पुढे येतात, सायकल प्रवास हा आयुष्यातील अनुभवांची शिदोरी आहे, असे ही त्यांनी सांगितले.

जुगल राठी म्हणाले, आजच्या काळात आपले शाररिक आणि मानसिक आरोग्य टिकविण्यासाठी आपण किती प्रयत्न करतो? त्यासाठी दिवसातील किती वेळ देतो, याचा विचार केला पाहिजे. व्यायाम, योग्य आहार आणि मानसिक आरोग्यासाठी मेडिटेशन याची त्रिसुत्री साधली तर तुमची जीवनशैली उत्तम राहिल, असे ही त्यांनी सांगितले.

विकास मालपुटे म्हणाले, या ज्येष्ठ सायकलवीरांची प्रेरणा घेऊन तरुणांनी देखील आपल्या शरीर स्वास्थ्याकडे लक्ष द्यावे आणि त्यांना आरोग्याचे महत्व कळावे यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. व्यायामाला सुरूवात करणारे अनेकजण दिसतात, परंतु त्यामध्ये सातत्य टिकवून ठेवणाऱ्यांची संख्या मात्र कमी आहे. व्यायामात सातत्य ठेवण्यासाठी व त्यातून लोकांची जीवनशैली सुधारण्यासाठी व्ही 3 फिटनेस क्लबच्यावतीने विविध उपक्रम राबविले जातात, असे ही त्यांनी सांगितले

See also  बैलगाडी शर्यत सुरु करावी यासाठी वडगांव तहसील कार्यालय येथे आंदोलन