डॉ. सागर बालवडकर व औंध क्रिकेट क्लब यांच्या वतीने औंध येथे भव्य डे नाईट फुल पिच क्रिकेट स्पर्धा उद्घाटन संपन्न.

0
slider_4552

औंध :

डॉ. सागर गणपतराव बालवडकर व औंध क्रिकेट क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य डे नाईट (फुल पिच) क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन औंध गाव येथील इंदिरा गांधी शाळेच्या क्रीडांगणावर युवा नेते किरण चांदेरे यांच्या हस्ते करण्यात आले.

या स्पर्धेमुळे औंध गावातील युवकांचा उत्साह वाढून खेळातून त्यांना आनंद घेता यावा या उद्देशाने ही स्पर्धा भरवली असल्याचे सागर बालवडकर यांनी या स्पर्धेची माहिती देताना सांगितले. ही स्पर्धा दिवसा आणि विद्युत प्रकाश झोतात होणार असून स्पर्धेला नामवंत 50 संघांनी सहभाग नोंदविला आहे. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही स्पर्धा संपन्न व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करीत, औंध गावातील नागरिकांनी युवकांचा उत्साह वाढविण्याकरता ही स्पर्धा पाहण्यासाठी अवश्य यावे असे आवाहन करत आहे.

यावेळी अक्षय मुरकुटे, राहूल जुनवणे, दीपक गायकवाड, माऊली जुनवणे, ओंकार गवारे, विदुल पगारे, राजू सावंत, अक्षय मुंगसे, अमित रानवडे, आणि आमगाव क्रिकेट क्लब चे खेळाडू उपस्थित होते.

See also  औंध येथे 'काव्य अटल' उपक्रम उत्साहात संपन्न.