पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघावर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता

0
slider_4552

पुणे :

पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता मिळाली आहे. जिल्हा दूध संघ संचालक मंडळाच्या १६ जागा आहेत. यापैकी उमेदवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवसापर्यंत पाच जागा बिनविरोध झाल्या होत्या. सोमवारी निकाल लागला असून, सर्व जागी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत.

कात्रज दूध संघ संचालक मंडळाच्या १६ जागा आहेत. यापैकी उमेदवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवसापर्यंत पाच जागा बिनविरोध झाल्या होत्या. या निवडणुकीतील उर्वरित ११ जागांसाठी २५ उमेदवार निवडणूक आखाड्यात होते. या निवडणुकीसाठी आंबेगाव, भोर, दौंड, खेड, जुन्नर, शिरूर, मावळ, पुरंदर आणि वेल्हे या नऊ तालुक्यांत १०० टक्के मतदान झाले होते. जिल्ह्यातील मुळशी व हवेली या दोन तालुक्यांचा अपवाद वगळता उर्वरित ९ तालुक्यांत पैकीच्या पैकी (१०० टक्के) मतदान झालेले. सोमवारी सकाळी नऊ वाजता मतमोजणी सुरू झाली. मतमोजणीनंतर लगेचच निकाल जाहीर झाला असून, या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व उमेदवार विजयी झाले आहे.

सहकार क्षेत्रात पहिल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप घारटकर यांनी विजयानंतर बोलताना व्यक्त केले.

See also  जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी ज्ञानेश्वर तापकीर यांचा उमेदवारी अर्ज दाखल......