एसटी कर्मचाऱ्यांचे नेतृत्व करणारे ॲड.गुणरत्न सदावर्ते यांना अटक

0
slider_4552

मुंबई :

एसटी कर्मचाऱ्यांचे नेतृत्व करणारे ॲड.गुणरत्न सदावर्ते यांना मुंबईच्या गावदेवी पोलिसांनी ताब्यात घेतले.

गुणरत्न सदावर्ते यांनी आझाद मैदान येथे दिलेल्या भाषणात शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह टिका केली होती. या नंतर कामगारांनी आजचे हे हिसंक आंदोलन केले त्यामुळे गुणरत्न यांना ताब्यात घेतले होते. चौकशीनंतर आता ॲड.गुणरत्न सदावर्ते यांना भादंवि कलम 353, 333, 34 120 (ब) क्रिमिनल अबेटमेंट कलमांतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने एसटी कर्मचाऱ्यांच्या विलीनीकरणाच्या मुद्द्यावर निर्णय देताना संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना १५ एप्रिल पर्यंत कामावर रुजू होण्याचे आदेश दिले आहेत

मात्र, हा ६ एप्रिलला न्यायालयाकडून निर्णय आल्यानंतरही एसटी कर्मचाऱ्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर हिंसक पद्धतीने आंदोलन केले. यावेळी पवार यांच्या निवासस्थानावर आंदोलकांनी दगडफेक केली तसेच चपलाही फेकल्या. या घटनेचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटले. शरद पवारांच्या घरावर हल्ला निषेधार्ह असल्याच्या प्रतिक्रिया विविध स्तरातून व्यक्त झाल्या. मुंबईच्या गावदेवी पोलिसांनी २३ महिलांसह १०७ जणांवर गुन्हे दाखल केल.

त्यानंतर, ॲड.गुणरत्न सदावर्ते यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून गावदेवी पोलिसांनी सदावर्ते यांच्या घरी जाऊन त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीनंतर सदावर्ते यांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे सदावर्तेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

See also  दोन डोस मधील अंतर कमी करण्याचा विचार केंद्राने करावा : राजेश टोपे