मुंबई :
मुंबईतील माटुंगा स्थानकावर दोन एक्स्प्रेस समोरा समोर आल्याने धडक बसून पुद्दुचेरी एक्स्प्रेसचे तीन डबे रुळावरून घसरले, अद्याप कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही, असे मध्य रेल्वेच्या प्रवक्त्याने सांगितले.
दादर रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक ५ वरून एक्स्प्रेस सुटल्यानंतर माटुंगा रेल्वेस्थानकाजवळ दोन लांब पल्ल्याच्या गाड्या एकमेकांसमोर आल्या. गदग एक्स्प्रेस आणि पद्दुचेरी एक्स्प्रेस या गाड्या एकाच ट्रॅकवर आल्या. त्यानंतर मागून आलेल्या एक्स्प्रेसचं इंजिन दादर -पद्दुचेरी एक्स्प्रेसला धडकलं. त्यानंतर एक्स्प्रेसचे मागील ३ डबे रुळावरून घसरले. दादरहून ही एक्स्प्रेस सुटल्यानंतर काही वेळातच माटुंगा स्थानकाजवळ हा रेल्वे अपघात झाला.
दादर स्टेशनहून दादर – पोंडेचेरी एक्सप्रेस रात्री पावणे दहाच्या सुमारास निघाली होती. ही ट्रेन सुटत असताना गडग एक्सप्रेस समोर आल्याने हा आपघात झाला. या अपघातामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. प्राथमिक दृष्ट्या चुकीचा सिग्नल दिल्याने हा अपघात झाला आणि दोन्ही गाड्यांची धडक झाली. सुदैवाने यात कोणतीही जखमी झाले नसल्याचे कळते. या अपघातामुळे मध्य रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. अपघातामुळे रात्री कामावरून घरी परतणाऱ्या प्रवासाचे मात्र प्रचंड हाल झाले.