मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पाठवणार राज्यपालांकडे राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांची नवी यादी..

0
slider_4552

मुंबई :

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांची नवी यादी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे पाठवण्यात येणार आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

याआधीच्या यादीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आणि इतर राजकीय नेत्यांची नावे वगळण्यात येणार असून मुख्यमंत्री नवीन यादी पुढील आठवड्यात राज्यपालांकडे पाठवणार आहेत.

दीड वर्षा होऊन गेले तरी विधानपरिषदेत राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांची शिफारस करून देखील कोश्यारींनी अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही. यामुळे आता मुख्यमंत्र्यांनी पुन्हा नवीन यादी तयार करून राज्यपालांकडे पाठवण्यात आली आहे. नवीन यादीत मुख्यमंत्र्यांनी एकनाथ खडसे आणि राजू शेट्टींचे नाव वगळले असून आता नवीन यादीत यांच्या जागी कोणत्या नेत्यांची नावे येणार याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे.

नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट झाली. या भेटीत शरद पवारांनी पंतप्रधानांकडे राज्यपाल नियुक्त सदस्यासंदर्भात चर्चा केली असून राज्यपालांनी अद्याप विधानपरिषदेवर सदस्यांची नियुक्त केली नाही, यावर सवाल उपस्थित केले होते. राज्यात महाविकासआघाडी सरकार आल्यानंतर राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांची नावे मंत्रिमंडळाने मंजूर केली होती. यानंतर १२ सदस्यांची नवे राज्यपालांकडे पाठवली होती. परंतु, अद्यापही राज्यपालांनी १२ सदस्यांची नवे मंजूर न केल्यामुळे मुख्यमंत्री आता पुन्हा नवीन यादी तयार केली असून ती यादी राज्यपालांकडे पाठवणार आहे.

See also  ओबीसी आरक्षण प्रकरणी २ मार्च रोजी न्यायालय निकाल देण्याची शक्यता