माजी नगरसेवक सनी निम्हण आयोजीत रक्तदान शिबिरात विक्रमी ८०९ रक्तदात्यांनी केले रक्तदान

0
slider_4552

सोमेश्वरवाडी :

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून माजी नगरसेवक सनी उर्फ चंद्रशेखर विनायक निम्हण यांच्या संकल्पनेतून सोमेश्वर देवस्थान सोमेश्वरवाडी पाषाण, विठ्ठल सेवा मंडळ सोमेश्वरवाडी(एक गाव एक गणपती) यांच्या वतीने श्री शिवशंभु चारिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्य यांच्या सहकार्याने आज रविवार दि. ५/६/२०२२ रोजी भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरास विक्रमी ८०९ रक्तदात्यांनी उस्फुर्त प्रतिसाद देत रक्तदान केले.

कार्यक्रमाची माहिती देताना माजी नगरसेवक सनी निम्हण म्हणाले की, आम्ही केलेल्या आवाहनाला परिसरातील युवकांनी नागरिकांनी आणि महिलांनी उस्फुर्त प्रतिसाद देत रक्तदान केले हे फार आनंददायी आहे. परिसरातील तरुणांनी समाजाचे ऋण फेडण्यासाठी, निरोगी समाजासाठी, शिवविचारांना जागत, मोठ्या प्रमाणात सर्वांनी येऊन रक्तदान केले त्याबद्दल मी रक्तदात्यांचा आभारी आहे. येणाऱ्या पुढील काळात देखील वेगवेगळ्या समाजोपयोगी कार्यक्रम आपण राबविणार आहोत त्यास देखील आपण असाच उदंड प्रतिसाद देत रहाल असा विश्वास आहे.

यावेळी सोमेश्वर देवस्थान विश्वस्त पोपटराव जाधव, कै. बाळोबा सुतार दिंडी अध्यक्ष खंडू अरगडे, माजी महापौर दत्तात्रय गायकवाड, औंध गाव विश्वस्त मंडळ अध्यक्ष योगेश जुनवणे, भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष गणेश कळमकर, राहुल कोकाटे, प्रल्हाद सायकर, प्रकाश बालवडकर, RPI चे रमेश ठोसर, संजय निम्हण, संजय बालवडकर, गोविंद रणपिसे, मोरेश्वर बालवडकर, बालम सुतार, योगेश सुतार, रुपेश जुनवणे, मुन्ना शिंदे, सुप्रीम चोंधे, आणि परिसरातील सांप्रदायिक क्षेत्रातील मान्यवरांनी आवर्जून उपस्थित राहून रक्तदात्यांना प्रोत्साहन दिले.

या रक्तदान शिबिराचे आयोजन माजी नगरसेवक सनी विनायक निम्हण, सोमेश्वर देवस्थान सोमेश्वरवाडी पाषाण, विठ्ठल सेवा मंडळ सोमेश्वरवाडी(एक गाव एक गणपती) यांनी केले होते.

See also  अडचणीच्या प्रसंगी मदत करणारे सगळ्यांशी मैत्री असणारे ज्ञानेश्वरभाऊ तापकीर : भानुप्रताप बर्गे