औंध :
पुण्यामध्ये सध्या डेंग्यूची लक्षणे जाणवू लागली आहे. त्यात पावसाळा सुरू झाल्याने डेंग्यू आजार वाढण्याची शक्यता आहे. म्हणुनच माजी नगरसेवक सनी निम्हण यांच्या वतीने डेंगू चा वाढता प्रादुर्भाव रोखण्याकरिता प्रभाग क्र. १२ औंध-सोमेश्वरवाडी-बालेवाडी या भागासाठी ‘डेंग्यू नियंत्रण औषध फवारणी मोहीम!’ राबविली जात आहे.
या मोहिमेची माहिती मॅक न्यूज ला देताना माजी नगरसेवक सनी निम्हण म्हणाले की, डेंग्यू आजार हा दुर्लक्ष केले तर जीवघेणा ठरू शकतो. हा डासांपासून उद्भवणारा आजार आहे. त्यामुळे स्वच्छता राखणे व पाणी साचू न देण्यासारखे उपाय राबविणे गरजेचे आहे. सध्या डेंग्यूमुळे जनता त्रस्त आहे. त्यामुळे त्यास वेळीच आळा घालणे गरजेचे आहे. याच उद्देश्याने डेंग्यू आजाराचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी आम्ही प्रभाग क्र. १२ औंध-सोमेश्वरवाडी-बालेवाडी या भागासाठी ‘डेंग्यू नियंत्रण औषध फवारणी मोहीम!’ राबवित आहोत.
पुढे ते म्हणाले आपल्या परिसरात डेंग्यूचा प्रसार होत असल्यास आम्हाला आवर्जून 8308123555 या क्रमांकावर संपर्क साधावा. आमची टीम डेंग्यू नियंत्रक औषध फवारणीसाठी तिथे येईल. जेणेकरून डेंगू या आजाराला रोखण्यात आपणास यश येईल. म्हणूनच माझी प्रभाग क्रमांक 12 मधील सर्व नागरिकांना विनंती आहे की, चला आपण सर्वांनी मिळुन ‘डेंग्यू नियंत्रण औषध फवारणी मोहीम!’ मध्ये सहभागी होवून डासांची विल्हेवाट लावूया, डेंग्यूला हद्दपार करूया! आपले आणि आपल्या कुटुंबाचे आरोग्य सुरक्षित ठेवू या.
डेंग्यू नियंत्रक औषध फवारणीसाठी संपर्क : 8308123555