पुणे :
पुण्यात 3600 गणेश मंडळाच्या गणपतीचे विसर्जन संध्याकाळी पाच वाजता पुर्ण झाले. दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेश मंडळाच्या गणपतींचे विसर्जन शांततेत पार पडले. पुण्यातील गणेश विसर्जन उत्साहात कोणताही अनुचित प्रकार नाही अशी माहिती पुणे पोलीस आयूक्त अमिताभ गुप्ता यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली.
विसर्जनादरम्यान कडेकोट बंदोबस्त संपूर्ण मिरवणुकीमध्ये 48 तास पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता. पोलीस बंदोबस्तामध्ये कुठलीही कमतरता नव्हती. तसेच कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार यावेळी घडलेला नाही. मानाच्या पाच गणपतीमध्ये थोड अंतर होतं परंतु त्याने आज काही फरक पडलेला नाही. कालच्या मिरवणुकीला थोडा उशीर झाला. पण आज वेळेतच विसर्जन करण्यात आलेले आहे. आणि शेवटचा महाराष्ट्र तरुण गणेश मंडळाचा गणपती हा पाच वाजता विसर्जन करण्यात आल्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितलेले आहे.
वाहतूक व्यवस्था सूरळीत दोन वर्षानंतर निर्बंधमुक्त गणेश उत्सव असल्यामुळे आणि बंदोबस्तामध्ये अनुभवी लोक थोडे कमी असल्यामुळे थोडा वेळ लागला. परंतु बंदोबस्तामध्ये कुठलीही गडबडी झाली नाही. किंवा कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. अतिशय योग्य रीतीने गणेश विसर्जन पार पडले आहे. थोड्याच वेळात आम्ही पेठेतले बॅरीकेट्स काढायला सांगितलेले आहेत. दुपारपासूनच उपनगरातले जे रस्ते आहेत ते खुले करण्यात आलेले आहेत. आणि पुण्यात वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यात आल्याचेही यावेळी पोलीस आयुक्तांनी सांगितले आहे.
पोलिसांच्या रेकॉर्डनुसार मिरवणूक 29 तासात संपली तर प्रत्यक्षात मंडळांच्या माहितीनुसार मिरवणुकीत शेवटचा गणपती विसर्जित व्हायला तब्बल 31 तास लागल्याचे सांगण्यात येत आहे.
विसर्जन मिरवणुकीतील मंडळांमधले वाढलेली अंतर, ढोल ताशा पथकाची प्रचंड संख्या यामुळे प्रामुख्याने उशीर झाल्याचे सांगण्यात येत आहे. कोरोना संकटामुळे दोन वर्षांच्या खंडानंतर पुण्यात विसर्जन मिरवणूक पार पडली. परिणामी मंडळांचा आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांचा अमाप उत्साह मिरवणुकीत जाणवला.