बावधन येथे क्षेत्रीय कार्यालयांतर्गत ‘स्वच्छ अमृत महोत्सवानिमित्ताने’ रॅली ला मोठा प्रतिसाद..

0
slider_4552

बावधन :

केंद्र शासनामार्फत ‘स्वच्छ अमृत महोत्सवानिमित्ताने’ आयोजित केलेल्या उपक्रमांतर्गत ‘इंडियन स्वच्छता लीग’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने कोथरुड बावधन क्षेत्रीय कार्यालयांतर्गत नव्याने समाविष्ट गाव बावधन बुद्रुक मध्ये परिसरातील नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी स्वच्छता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

परिसरातील स्वछतेमध्ये सर्वांचा सहभाग वाढवा , आपल्या परिसराचे आपुलकीचे नाते निर्माण व्हावे दृष्टीने या उपक्रमांनिमित्ताने बावधन येते महापालिका सहाय्यक आयुक्त केदार वझे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य कोठीचे सफाई कर्मचारी, शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, प्रकृती वेस्ट मॅनेजमेंट टीम, आरोग्य विभाग अधिकारी आणि ग्रामस्थ रहिवासी यांना सोबत घेऊन बावधन गाव गावठाण परिसर, राम नदी परिसर, शिवसेना ऑफीस परिसरात नागरिकांमध्ये जनजागृती करणेसाठी स्वच्छता रॅलीचेआयोजन केले. सर्वांनी मिळुन रामनदी पात्रात स्वच्छता केली.

यावेळी वरिष्ठ आरोग्य निरीक्षक राम सोनावणे, आरोग्य निरिक्षक हनुमंत चाकणकर, मोकादम राम गायकवाड व आरोग्य कोठीचे सफाई कर्मचारी व चेतन दत्ताजी गायकवाड शाळेचे मुख्याध्यापक वाघमारे सर तसेच शिक्षकवर्ग व विद्यार्थी, विद्यार्थीनी तसेच प्रकृती वेस्ट मॅनेजमेंटच्या श्रीमती वाकणकर मॅडम त्यांचे सहकारी अर्जुन साठे स्थानिक रहीवासी ग्रामस्थ उपस्थित होते.

See also  स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त स्वारद फाउंडेशनच्यावतीने ऑनलाइन नृत्य स्पर्धा संपन्न