अहमदाबाद :
अहमदाबाद येथे सुरू असलेल्या 36 व्या नॅशनल गेम्स मध्ये महाराष्ट्राच्या महिला कबड्डी संघाने तामिळनाडू वर दणदणीत विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला तर महाराष्ट्राच्या पुरुष संघाने देखील अटीतटीच्या सामन्यात बलाढ्य हरियाणा चा पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला.
पुण्याची कर्णधार स्नेहल शिंदेचा, सोनाली शिंगटे यांचा उत्कृष्ट खेळ व अंकिता जगताप रेखा सावंत यांनी सुंदर पकडी करून दिलेल्या साथी मुळे तामिळनाडू महिला संघाचा ४५ – २५ असा वीस गुणांनी दणदणीत पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. तर दुसऱ्या सेमी फायनल अटीतटीच्या सामन्यात हिमाचल प्रदेश महिला संघाने हरियाणाच्या महिला संघाचा २८-२७ असा एका गुणांनी पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. महिलांचा अंतिम सामना महाराष्ट्र आणि हिमाचल प्रदेश असा होईल.
तर महाराष्ट्राच्या पुरुष संघाने प्रदिप नरवाल, संदिप नरवाल च्या बर्थडे हरियाणा संघावर चुरशीच्या लढतीत ३९ – ३५ असा चार गुणांनी पराभव केला. कर्णधार शंकर गडई यांनी केलेल्या सुंदर पकडी व पंकज मोहिते असलम इनामदार सहित सर्वांनी केलल्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर बलाढ्य हरियाणाला नमवीत अंतिम फेरीत प्रवेश केला. तर दुसऱ्या सेमी फायनल सामन्यात राहुल चौधरी, नितीन तोमर च्या अनुभवी संघाने सर्व्हिसेस संघाचा ४३-२७ असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.