बाणेर बालेवाडी येथील वीज पुरवठा उच्चदाब वाहिन्या जळून गेल्याने रात्री उशिरा पर्यंत खंडित

0
slider_4552

बाणेर :

बाणेर रस्त्यावरील महाबळेश्वर हॉटेल जवळ रांका ज्वेलर्स शेजारील राम नदी वाहत असलेल्या पुलाजवळ कचऱ्याला लागलेल्या आगीमुळे विद्युत पुरवठा करणाऱ्या उच्चदाब वाहिन्या जळून गेल्याने बाणेर आणि बालेवाडी, पाषाण परिसरातील वीजपुरवठा शुक्रवारी सायंकाळी ५ : ३० दरम्यान खंडित झाला. त्यामुळे परिसरातील विद्युतपुरवठा महावितरण ने शर्थीचे प्रयत्न करत रात्री साडे अकराच्या आसपास सुरू केला.

सदर घटनेची माहिती मिळाल्यानंतर महावितरणकडून त्वरित वीजवाहिन्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. मात्र, उच्चदाब वाहिन्यांचे काम असल्याने त्याला विलंब झाला. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत अनेक भागात वीजपुरवठा बंदच होता. कचऱ्याला नेमकी आग कशी लागली, हे समजू शकले नसल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले.

See also  ॲड. मोनिका वाडकर यांचा बाणेर नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने सन्मान.