ॲड. मोनिका वाडकर यांचा बाणेर नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने सन्मान.

0
slider_4552

बाणेर :

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पॅनेलवर ॲड. मोनिका सचिन वाडकर यांची कायदा सल्लागार पदी नियुक्ती झाल्यामुळे त्यांचा सत्कार बाणेर नागरी पतसंस्थेचे संस्थापक/अध्यक्ष ज्येष्ठ शिवसैनिक डॉ. दिलीप मुरकुटे यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

सत्कार करताना डॉ दिलीप मुरकुटे यांनी सांगितले की, बाणेर गावातील एका महिला भगिनींची पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पॅनेलवर कायदा सल्लागार पदी नियुक्ती होणे अभिमानास्पद आहे. त्यांना शुभेच्छा देवून त्यांचे मनोबल वाढविणे हे आपले कर्तव्य आहे. त्यांनी अशीच प्रगती दिवसेंदिवस करत राहावे अशा सदिच्छा व्यक्त केल्या.

सत्काराला उत्तर देताना ॲड. मोनिका वाडकर यांनी सांगितले की, डॉ. दिलीप मुरकुटे यांचे नेहमीच पाठबळ मिळत असते. त्यांच्या मिळत असणाऱ्या शुभेछा मुळे काम करताना वेगळी उर्जा मिळते. त्यांनी सगळ्यांचे आभार मानले.

यावेळी सत्कार मूर्ती मोनिका वाडकर, डॉ. दिलीप मुरकुटे, सचिन वाडकर, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपलक्ष्मी बेळगावकर, कर्जे वसुली अधिकारी मनीषा लगड, लिपिक श्वेता वाघ, लिपिक रूपाली पाटील, संतोष भोसले उपस्थित होते.

तसेच यावेळी अपघातात जखमी झालेले पत्रकार बाबा तारे यांना आर्थिक मदत म्हणून डॉ. दिलीप मुरकुटे यांच्या वतीने १५००० रूपये देण्यात आले.

See also  सुस-म्हाळुंगे गावात विविध विकासकामांचे भुमिपुजन संपन्न..!