विजय हजारे ट्रॉफी मधुन मुंबई बाहेर, जम्मू कश्मीर संघ स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच उपांत्य पूर्व फेरीत दाखल.

0
slider_4552

मुंबई :

देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात मोठी वनडे स्पर्धा असलेली विजय हजारे ट्रॉफी आपल्या अखेरीस येत आहे.‌ शनिवारी (26 नोव्हेंबर) स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीचे सामने खेळले गेले.

या तीनही सामन्यात कर्नाटक, उत्तर प्रदेश व जम्मू-कश्मीरने विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत जागा पटकावली.‌ 28 नोव्हेंबर रोजी उपांत्यपूर्व फेरीचे सामने खेळले जातील.

स्पर्धेच्या प्रारुपानुसार यापूर्वी पाच संघांनी थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. त्यानंतर सहा संघादरम्यान‌ उपउपांत्यपूर्व फेरीचे तीन सामने खेळले गेले.‌ कर्नाटक विरुद्ध झारखंड अशा खेळल्या गेलेल्या पहिल्य सामन्यात झारखंड संघाने प्रथम फलंदाजी करताना कुमार कुशाग्र व अनुकूल रॉय यांच्या अर्धशतकांच्या जोरावर 187 धावा बनविल्या. या धावांचा पाठलाग करताना कर्नाटक संघाने निकीन जोस व रवी कुमार समर्थ यांच्या अर्धशतकांच्या जोरावर 40 षटकात हे लक्ष पार केले.

दुसऱ्या सामन्यात सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी आपल्या नावे केलेल्या मुंबईने उत्तर प्रदेशचा सामना केला. विजयाचे दावेदार असलेल्या मुंबईसाठी पृथ्वी शॉ हा अपयशी ठरला. यष्टीरक्षक हार्दिक तामोरे व अष्टपैलू शम्स मुलानी यांनी अर्धशतके साजरी केले. मात्र, तरी देखील मुंबईचा डाव केवळ 220 धावांवर कोलमडला. आर्यन जुयालने नाबाद 82 धावांची खेळी करत उत्तर प्रदेशला आठ गडी राखून विजय मिळवून दिला.

दिवसातील तिसऱ्या सामन्यातही अनपेक्षित निकाल पाहायला मिळाला. आपला नियमित करणे तर संजू सॅमसन याच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या केरळ संघाला केवळ 178 धावांपर्यंत मजल मारता आली होती. हे आव्हान जम्मू कश्मीरने केवळ तीन गडी गमावत पार केले. जम्मू कश्मीर संघ स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच उपांत्य पूर्व फेरीत दाखल झाला आहे. ‌‌

See also  प्रो - कबड्डी लीगसाठी प्रदिप नरवाल, सिद्धार्थ देसाई यांना कोटीची बोली.