मुंबई २६/११ शहिदांच्या स्मरणार्थ पुणे शहर पोलिसांच्या वतीने चित्रकला स्पर्धेचे आयोजन करत श्रद्धांजली अर्पण

0
slider_4552

पुणे :

मुंबईमध्ये २६/११ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांच्या स्मरणार्थ पुणे शहर पोलीस आणि शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ ट्रस्टतर्फे पुण्यामध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पोलीस दलातर्फे बँडच्या माध्यमातून सारसबाग येथे शहिदांना आदरांजली अर्पण करण्यात आली.

शहिदांना मानवंदना

पुण्याचे पोलीस आयुक्त उपस्थित : पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांसह सर्व अधिकारी, मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सारसबाग येथे झालेल्या मानवंदनेनंतर जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकारी व कर्मचा-यांनी दाखविलेल्या धाडसाला मानवंदना देण्यासाठी पुण्यातील पोलीस दलाच्या पुढाकाराने दरवर्षी हा कार्यक्रम आयोजित केला जातो. तसेच देशभक्तीपर व सामाजिक विषयांवरील कल्पना विद्यार्थ्यांनी चित्रकलेच्या माध्यमातून मांडाव्यात आणि विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती जागृत होण्यासोबतच शहिदांना श्रद्धांजली अर्पण करावी, याकरीता चित्रकला स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात येते.

विद्यार्थ्यांची चित्रकला स्पर्धा : ही स्पर्धा पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी तसेच खुल्या गटासाठी आयोजित करण्यात ( Students painting competition ) आली. गट अ १ली ते २री, गट ब ३री ते ४थी याकरिता रंगभरण आणि गट क ५वी ते ७वी, गट ड ८वी ते १०वी व खुल्या गटात दिलेल्या विषयावर स्पर्धा झाली. सेवा मित्र मंडळाचे अध्यक्ष सागर कुलकर्णी म्हणाले, स्पर्धेचे परीक्षण कला क्षेत्रातील मान्यवरांनी केले. ज्या शाळेतील सर्वाधिक स्पर्धक सहभागी झाले होते, त्या शाळेला विशेष पारितोषिक देण्यात आले

See also  शहरात लगेचच लॉकडाउन करण्याची गरज भासणार नाही : महापौर