संविधान दिनानिमित्त पुणे बार असोसिएशन तर्फे व्याख्यानाचे आयोजन…

0
slider_4552

शिवाजीनगर :

पुणे जिल्ह्यातील वकिलांची शिखर संघटना असलेल्या पुणे बार असोसिएशन तर्फे संविधानदिनानिमित्त शुक्रवार दिनांक २५/११/२०२२ रोजी म्हणजेच संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला “संविधानाची निर्मिती व कार्ये” या विषयावर महाराष्ट्र व गोवा वकील परिषदेचे माजी अध्यक्ष गुरुवर्य ऍड. सुधाकररावजी आव्हाड सर यांच्या व्याखानाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष पांडुरंग थोरवे उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना माननीय. आव्हाड सर हे म्हणाले की, संविधान हे सर्वतोपरी असून सर्वांनी त्याचे पालन केले पाहिजे. देशातील ३९९ तज्ञ मंडळीनी संविधान बनविण्यासाठी कष्ट घेतले असून यासाठी ६० देशांच्या संविधानाचा अभ्यास करण्यात आला होता… लोकांचे हित चांगल्या पद्धतीने जपण्यासाठी समितीने अभ्यासपूर्ण संविधान बनविले. डॉ. आंबेडकरांचे योगदान व कष्ट सगळ्यात महत्वाचे असुन राज्यघटनेच्या प्रत्येक पानावरील प्रत्येक ओळीत आंबेडकर दिसतात. राज्यघटने मध्ये बाहेरील तत्वे हस्तक्षेप करणार नाही याची काळजी घेऊन राज्यघटना तयार करण्यात आली आहे. आपण केवळ घटनेचा अभ्यास न करता घटना तयार कारणाऱयांचे त्या मागचे तत्वज्ञान समजून घेतले पाहिजे. तसेच घटना तयार करणाऱ्यापैकी काही लोक जेव्हा पूढे राज्यकर्ते झाले तेव्हा त्यांनी घटनेत दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केला.. बऱ्याचदा राज्यकर्त्याकडून तसे प्रयत्न होतात परंतु घटनेच्या मूळ गाभ्याला धक्का पोहोचवता येत नाही… घटना ही सर्वश्रेष्ठ ठरते. आपण सर्वांनी घटना अभ्यासली पाहिजे व त्याप्रमाणे कार्य केले पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त करताना उपस्थित वकील वर्गास घटना कशी निर्माण झाली व ती निर्माण होत असतानाच्या घडामोडी व घटना निर्माण झाल्यानंतरच्या काळात तिची कार्ये हे सर्व उलगडून सांगत मार्गदर्शन केले.

याप्रसंगी बोलताना पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष पांडुरंग थोरवे म्हणाले की, लोकशाही मध्ये संविधानाचे योगदान अनन्य साधारण आहे. वास्तविक संविधान कसे तयार झाले, त्याच्या निर्मितीचा इतिहास व संविधान तयार करणाऱ्या प्रत्येकाची भूमिका व त्यांचे योगदान हे सर्वांना विस्तृतपणे कळावे या उद्देशाने या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे तसेच याप्रसंगी मा. अध्यक्ष यांनी संविधान दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या.

See also  अंतिम चेंडूवर षटकार खेचत बॉडी गेट संघाने मिळविले ए.बी.बी. चषकाचे विजेतेपद.

तसेच या प्रसंगी पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट बार असोसिएशनच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार पुणे बार असोसिएशनकडून करण्यात आला.

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुणे बार असोसिएशन चे अध्यक्ष ऍड. पांडुरंग थोरवे यांनी केले.
तसेच सूत्रसंचालन पुणे बार असोसिएशनचे हिशोब तपासणीस ॲड. शिल्पा कदम यांनी केले व आभार कार्यकारिणी सदस्य ॲड. अमोल भोरडे यांनी मानले.

सदर कार्यक्रमास उपाध्यक्ष ऍड विवेक भरगुडे, उपाध्यक्ष ऍड. लक्ष्मणराव येळेपाटील, सेक्रेटरी- ॲड. अमोल शितोळे, सेक्रेटरी- सुरेखा भोसले, व कार्यकारिणी सदस्य – ॲड. काजल कवडे, . सई देशमुख, ॲड. अर्चिता जोशी, ॲड. ॲड.तेजस दंडागव्हाळ, ॲड. मजहर मुजावर व मोठ्या संख्येने वकील बांधव उपस्थित होते.