मुंबई :
देशांतर्गत क्रिकेटमधील मानाची विजय हजारे ट्रॉफी अंतिम टप्प्यात आली आहे. यावर्षी या स्पर्धेत महाराष्ट्र संघ पहिल्यांदा अंतिम सामन्यात पोहोचला आहे.




बुधवारी (30 नोव्हेंबर) विजय हजारे ट्रॉफी 2022 चा दुसरा उपांत्य सामना महाराष्ट्र आणि असाम यांच्यात खेळला गेला. महाराष्ट्राने हा सामना 12 धावांनी जिंकला. दरम्यान, ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा महाराष्ट्र संघ विजय हजारे ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात खेळणार आहे.
महाराष्ट्र संघाने या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी केली. 50 षटकांच्या या सामन्यात महाराष्ट्र संघाने 7 बाद 370 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात आसाम संघ 50 षटकांमध्ये 8 बाद 338 धावांपर्यंत मजल मारू शकला. कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि अंकित बावने यांनी या सामन्यात शतक केले. महाराष्ट्राच्या विजयात या दोघांचे योगदान महत्वाचे राहिले.
ऋतुराज गायकवाड विजय हजारे ट्रॉफीच्या चालू हंगामात जबरदस्त फॉर्ममध्ये दिसला आहे. आसामविरुद्धच्या उपांत्य सामन्यात त्याने 126 चेंडूत 168 धावा केल्या. हे त्याचे सलग दुसरे शतक आहे. उपांत्यपूर्व सामन्यात त्याने उत्तर प्रदेशविरुद्ध नाबाद 220 धावा केल्या होत्या. उपांत्य सामन्यात ऋतुराजला अंकित बावनेची साथ चांगली मिळाली. बावनेने 89 चेंडूत 110 धावा केल्या आणि महाराष्ट्र संघाचा धावसंख्या उंचावली. या दोघांव्यतिरिक्त सत्यजित बच्छाव याेने 41 धावांची महत्वपूर्व खेळी केली.
महाराष्ट्राकडून विजयासाठी 351 धावांचे लक्ष्य मिळाल्यानंतर आसाम संघासाठी स्वरूपम पुरकायस्था याने 94 धावाची सर्वात मोठी खेळी केली. तसेच रिषव दास (53) आणि सिबशंकर रॉय (78) प्रत्येकी अर्धशतकीय योगदान दिले. महाराष्ट्राच्या गोलंदाजी आक्रमाणापैकी राजवर्धन हंगर्गेकर याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.








