नवी दिल्ली :
जगभरात नोकरकपातीची लाट आलीय. बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून कर्मचारी कपात सुरु झालीय. फेसबुक, ट्विटर नंतर आता अमेझॉनही शेकडो कर्मचाऱ्यांना काढण्याच्या तयारीत आहे.




मात्र यावेळी भारतातल्या शेकडो कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर संक्रांत येणार आहे. पुढच्या महिन्यात ही कपात होणार आहे. अमेझॉन आपली अनेक ऑपरेशनल युनिट बंद करणार आहे, जॉब कटच्या लेटेस्ट रिपोर्टमधून ही माहिती समोर आलीय. अमेझॉनमुळे कोणत्या कर्मचाऱ्यांची नोकरी जाऊ शकते पाहुयात..
शेकडो भारतीयांच्या नोकऱ्या जाणार?
पाकिटबंद अन्नपदार्थ होम डिलिव्हरी सेवा अमेझॉन बंद करतंय
दोन महिन्यांसाठी ही सेवा बंद केली जाणार आहे
शेअर सर्व्हिस, बॅक ऑफिस आणि रिटेल ऑपरेश या क्षेत्राशी निगडीत शेकडो कर्मचाऱ्यांच्या नोक-या जाणार आहेत
काही दिवसांपूर्वी अमेझॉन कडून दहा हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचे संकेत देण्यात आले होते. त्याची आता सुरुवात होताना दिसतेय. दरम्यान नोकरकपात करणारी अमेझॉन पहिली कंपनी नाहि बऱ्याच कंपन्यांनी नोकर कपात केली आहे.
जगात नोकरकपातीची लाट
ट्विटरनं 3 हजार 700 कर्मचाऱ्यांना कामावरुन काढलं
सीगेटमधून 3000 जणांच्या नोकऱ्या गेल्या
मायक्रोसॉफ्टमधून 1000 कर्मचाऱ्यांना काढलं
स्नॅप चॅटमधून 20 % कर्मचारी कपात
ई-कॉमर्स स्टार्टअप उडानमधून 350 नोकऱ्या गेल्या
इंटेलमध्येही मोठ्या प्रमाणात नोकर कपातीचं संकट
ब्रेनलीनं भारतातील 35 पैकी 30 लोकांना नोकरीवरून काढलं
बायजूस, अनअकॅडमी, वेदांतू, व्हाईटहॅट ज्युनियर, ओला कंपन्यांकडून मोठी कपात








