सुस आणि महाळूंगे गावांना मिळणार लवकरच पाणी, समान पाणी पुरवठा योजना अंतर्गत पुणे महापालिकेने केल्या निविदा जाहीर..

0
slider_4552

बाणेर :

सुस आणि महाळूंगे गावांची पाणी समस्या वाढत्या नागरीकरणामुळे फार मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. हा नागरिकांचा जिव्हाळ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी माजी नगरसेविका ज्योती कळमकर आणि माजी नगरसेविका स्वप्नाली सायकर यांच्या सोबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या प्रयत्नांना यश मिळताना दिसत असुन पुढील काही महिन्यात मार्गी लागेल अशी अपेक्षा आहे.

या गावांना महापालिकेच्या समान पाणी पुरवठा योजने अंतर्गत पाणी पुरवठा करण्यासाठी दोन्ही गावांमध्ये नव्याने जलवाहिन्या टाकण्यात येणार असून त्यासाठी सुमारे 53 कोटी 37 लाख रूपयांची निविदा महापालिका प्रशासनाने जाहीर केली आहे. या निविदांसाठी एका महिन्याची मुदत आहे. त्यामुळे निविदांची सर्व प्रशासकीय पूर्ण करून पुढील काही महिन्यात प्रत्यक्ष कामास सुरूवात होणार आहे. त्यामुळे लवकरच या दोन्ही गावांचा पाणी प्रश्न मार्गी लागेल अशी अपेक्षा आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी वारंवार आढावा बैठका घेतल्या व आयुक्त विक्रम कुमार यांनी पुढील नियोजन करत या गावांमध्ये समान पाणी योजना राबविण्याचे जाहीर केले होते.

या बद्दल माहिती देताना माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी सांगितले की, सुस आणि महाळूंगे गावाची पाणी समस्या मार्गी लावण्यासाठी गाव महापालिकेत सामाविष्ट केल्या नंतर तत्कालीन पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याकडे या दोन्ही गावांना 24×7 या समान पाणी पुरवठा योजने मधे सामाविष्ट करावे अशी मागणी केली होती त्यांनी तात्काळ मागणी मान्य करत तशी तरतूद करू सांगितले. आणि आता प्रत्यक्षात पुण्याचे पालक मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रशासनाला सूचना केल्यानंतर सुस आणि महाळूंगे या दोन गावांच्या पाणी प्रश्न मार्गी लावण्यासाठी महापालिकेच्या समान पाणी पुरवठा योजने अंतर्गत पाणी पुरवठा करण्यासाठी दोन्ही गावांमध्ये नव्याने जलवाहिन्या टाकण्यात येणार असून त्यासाठी सुमारे 53 कोटी 37 लाख रूपयांची निविदा महापालिका प्रशासनाने जाहीर केली आहे.

See also  पेरिविंकलच्या तिन्ही शाखेचा दहावीचा 100 टक्के निकाल, बावधनचा ओम हजारेला 94 टक्के मार्क..

लवकरात लवकर या दोन्ही गावांना समान पाणी पुरवठा योजना अंतर्गत पाणी पुरवठा सुरू होवून दिवसेंदिवस गंभीर होत चाललेला पाणी प्रश्न मार्गी लागणार आहे. समान पाणी पुरवठा योजना अंतर्गत या दोन्ही गावांना नियमित पाणी उपलब्ध होईल अशी अपेक्षा यावेळी अमोल बालवडकर यांनी व्यक्त केली.