पेरिविंकलच्या तिन्ही शाखेचा दहावीचा 100 टक्के निकाल, बावधनचा ओम हजारेला 94 टक्के मार्क..

0
slider_4552

पिरंगुट :

चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज बावधनसह पिरंगुट व सूस शाखेने यशाची परंपरा राखत दहावीचा निकाल १००% लागला आहे . बावधन 49, पिरंगुट 19 तर सूसमधील 23 सर्व विद्यार्थ्यां उत्तीर्ण झाले आहे.

बावधनच्या ओम हजारे या विद्यार्थ्याने ९४.२०% गुण मिळवत संसथेत प्रथम क्रमांक पटकावला, तर कार्तिकी कांबळेने ९३.६०% मिळवून दुसरा क्रमांक पटकावला. ९३% गुणानिशी तबस्सुम सय्यद व चंचल शर्मा या तिसर्‍या क्रमांकावर आल्या आहेत. अभिमानाची गोष्ट म्हणजे तबस्सुम सय्यद या विद्यार्थिनीने विज्ञान विषयात सर्वोच्च ९९ गुण मिळवून विक्रम स्थापित केला आहे.
एकूण ७ विद्यार्थ्यांनी ९०% पेक्षा जास्त गुण मिळवत यापुढील विद्यार्थ्यांसाठी नवीन पायंडा पाडला. सर्व विद्यार्थ्यांना संस्थेचे संस्थापक श्री राजेंद्र बांदल सर, संचालिका सौ रेखा बांदल मॅडम, मुख्याध्यापिका रुचिरा खानवलकर मॅडम तसेच शाळेतील शिक्षकांचे योग्य व मौल्यवान असे मार्गदर्शन मिळाले.

नुकत्याच नव्या जागेत स्थलांतरीत झालेल्या पिरंगुट शाखेनेही 100 टक्के निकालाचा लौकिक कायम राखला आहे. तनिष्का राऊत 91.20% प्रथम, सानिया दाभाडे 91% व्दितीय, किरण घाडगे 89.40% तिसर्‍या क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. मुख्याध्यापक अभिजित टकलेसह पूनम पांढरे, सना ईनामदार यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

सूसमध्ये हश्मिता साळुंके 89%, यश निकाळजे 88%, संध्या चौधरी 87% अनुक्रमे प्रथम, व्दितीय व तृतिय क्रमांक प्राप्त झाला आहे. मुख्याध्यापिका निर्मल पंडित यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.

See also  बाणेर, बालेवाडी, सुस, म्हाळुंगे राष्ट्रवादी काँग्रेस प्रभाग क्रमांक ९ च्या वतीने दिवाळी सरंजाम वितरण समारंभ संपन्न