महाळुंगे :
शिवसेनेच्या 56 व्या वर्धापन दिनानिमित्त आणि सहकारमहर्षी समाजसेवक कायद्याचे ज्ञान असणारा सच्चा जनसेवक डॉ. दिलीप मुरकुटे (पाटील) यांच्या अभिष्टचिंतन सोहळा निमित्त प्रभाग क्रमांक १३ महाळुंगे येथे महाराष्ट्र भूषण समाज प्रबोधनकार ह भ प निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचे किर्तन आणि महाळुंगे गावचे आजी माजी सरपंच उपसरपंच तसेच बाणेर नागरी पतसंस्थेचे बिनविरोध नवनिर्वाचित संचालक यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला.
यावेळी बोलताना डॉ. दिलीप मुरकुटे (पाटील) म्हणाले की, पुणे महानगरपालिकेमध्ये सुस व महाळुंगे ही गावे समाविष्ट होण्याच्या आधीपासून या गावातील मतदारांनी या गावांवर शिवसेनेचा भगवा फडकवला आहे. तोच भगवा या परिसरातून नगरसेवक निवडून देऊन पुणे महानगरपालिकेवर फडकवायचा आहे. यासाठी आम्ही एक दिलाने प्रयत्न करत आहोत. यावेळेस पुणे महानगरपालिकेवर व सुस, महाळुंगे , बाणेर मध्ये शिवसेनेचा भगवा फडकणारच असा आम्ही ठाम निर्धार केला आहे.
यावेळी समाजसेविका ममता सिंधुताई सपकाळ म्हणाल्या की, दिलीप मुरकुटे यांनी सिंधुताई सपकाळ यांना अनेक अडचणी प्रसंगी मदत केली. अशीच मदत एक मोठा भाऊ म्हणून माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार याची खात्री आहे. दिलीप मुरकुटे सारखे खंबीर नेतृत्व या परिसराला मिळाले तर या परिसराचा चांगल्या पद्धतीने विकास होणार आहे.
शिवसेनेच्या ५६ व्या वर्धापन दिनानिमित्त या वेळी ५६ किलोचा केक, ५६ विद्यार्थ्यांचा सत्कार, 56 हजार रुपये अनाथ आश्रमास देणगी, ५६ अनाथ महिलांना साडी वाटप, तसेच महाळुंगे गावचे आजी माजी सरपंच, उपसरपंच, नागरी पतसंस्थेचे बिनविरोध नवनिर्वाचित संचालक असा ५६ जणांचा सत्कार यावेळी करण्यात आला.
यावेळी शिवसेना पुणे शहर प्रमुख गजानन थरकुडे, पुणे जिल्हा प्रमुख बाळासाहेब चांदेरे, पृथ्वीराज सुतार (गटनेते), शंकर मांडेकर (जि. प. सदस्य), ॲड. लीना गणेश मुरकुटे (पाटील) बाळासाहेब भांडे (शासकीय सदस्य), संतोष मोहोळ (उपजिल्हा प्रमुख), मयूर भांडे (युवा सेना जिल्हा समन्वयक, सरपंच), अविनाश कांबळे (समाजसेवक), गणपत मुरकुटे, मकरंद कळमकर, सुनिल कळमकर, धनजंय भोते, राजू शेडगे(अध्यक्ष बाणेर नागरी पतसंस्था), संजय ताम्हाणे (उपाध्यक्ष बाणेर नागरी पतसंस्था), आणि बाणेर नागरी सहकारी पतसंस्थेचे पदाधिकारी व नवनिर्वाचित संचालक तसेच महाळुंगे गावचे ग्रामस्थ, शिवसेना आजी माजी पदाधिकारी, महिला पदाधिकारी उपस्थित होते.